रत्नागिरी- आज कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- आज कार्यक्रम
रत्नागिरी- आज कार्यक्रम

रत्नागिरी- आज कार्यक्रम

sakal_logo
By

पान ५ साठी)

सागरी संशोधन केंद्रात आजपासून
गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीचे कार्यक्रम
रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत झाडगाव येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन प्रशिक्षण कार्यक्रम २३ ते २५ जानेवारी या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. यात मत्स्यशेतीबद्दल प्राथमिक माहिती, मत्स्यशेतीतील वाव, मत्स्यशेती योग्य माशांच्या जाती, विविध पद्धती, तलाव प्रकल्प बांधकाम, बिजाची वाहतूक, पाणी व्यवस्थापन, खाद्य व्यवस्थापन, खाद्य बनवणे प्रात्यक्षिक, रोग व्यवस्थापन, गोड्या पाण्यातील कोळंबी शेती, वाढ व नोंदी, मासळी काढणी आणि काढणीपश्चात काळजी, विक्री व्यवस्थापन आणि प्रकल्प अहवाल, शासनाच्या अनुदान योजना, बँकाच्या योजना, खासगी प्रकल्प भेट अशा विषयांवर विषय तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यशस्वी मत्स्यशेतकरी मार्गदर्शन करतील. बाहेरील प्रशिक्षणार्थीकरिता राहण्याची सोय करण्यात येणार आहे. अधिक माहितीकरिता प्रा. सचिन साटम यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संशोधन केंद्र प्रमुख व वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. प्रकाश शिनगारे यांनी केले आहे.


फोटो ओळी
-rat२१p१३.jpg- चंद्रकांत प्रभू

चंद्रकांत प्रभू यांच्यासाठी आज शोकसभा
रत्नागिरी ः पोमेंडी खुर्द येथील श्री महालक्ष्मी देवस्थानचे अध्यक्ष (कै.) चंद्रकांत हरिश्चंद्र प्रभू यांचे निधन झाले. त्यांना पोमेंडी खुर्द (काजरघाटी) रामेश्वरवाडी, कुवारबाव येथील ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा सोमवारी (ता. २३) दुपारी ३ वाजता श्री महालक्ष्मी देवस्थान येथे आयोजित केली आहे. या सभेकरिता ग्रामस्थ बंधू-भगिनी, देवस्थान कार्यकारिणी समिती सदस्य, उत्सव कमिटी सदस्य यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.