रत्नागिरी- गुरुवर्य अच्युतरावांच्या पुतळा ठरेल प्रेरणास्थान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- गुरुवर्य अच्युतरावांच्या पुतळा ठरेल प्रेरणास्थान
रत्नागिरी- गुरुवर्य अच्युतरावांच्या पुतळा ठरेल प्रेरणास्थान

रत्नागिरी- गुरुवर्य अच्युतरावांच्या पुतळा ठरेल प्रेरणास्थान

sakal_logo
By

rat22p1.jpg
77345
रत्नागिरी : पटवर्धन हायस्कूल येथे गुरुवर्य अच्युतराव पटवर्धन यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करताना डॉ. रमेश चव्हाण. सोबत राजाभाऊ लिमये, रमेश पटवर्धन, डॉ. श्रीरंग कद्रेकर, डॉ. अलिमियॉं परकार, नंदकुमार साळवी, डॉ. दिलीप नागवेकर आदी. (मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)
--------------
अच्युतरावांच्या पुतळा ठरेल प्रेरणास्थान
पटवर्धन हायस्कूल; माजी विद्यार्थी संघाचे योगदान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ : राष्ट्रपती पदकाने सन्मानित गुरुवर्य अच्युतराव पटवर्धन यांच्या पुतळ्याचे अनावरण आज शहरातील ज्येष्ठ डॉक्टर रमेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. गुरुवर्यांचा हा पुतळा सर्व विद्यार्थ्यांना नेहमी प्रेरणा देईल, असे या वेळी चव्हाण यांच्यासह अनेकांनी मनोगतामध्ये सांगितले.पटवर्धन हायस्कूल माजी विद्यार्थी संघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शताब्दी इमारतीमध्ये हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. यानंतर झालेल्या कार्यक्रमात पुतळा उभारणी व संकल्पना सिद्धीस नेण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल सल्लागार विनायक हातखंबकर, खजिनदार श्रीधर कुष्टे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. डॉ. कद्रेकर व डॉ. अलिमियॉं परकार यांनी आपण अच्युतरावांमुळे कसे घडलो आणि आज मोठ्या पदांवर पोहोचलो, वेळेची शिस्त आणि अभ्यासातील हुषारी, समाजातील वागणूक याबद्दल सविस्तर माहिती दिली.
शताब्दी इमारतीच्या जागी पूर्वीच्या काळात खूप जुने फणसाचे मोठे झाड होते. या ठिकाणी गुरुवर्य विद्यार्थ्यांना शिकवत असत. पुतळ्याच्या मागील बाजूस या झाडाची प्रतिमा लावून सुशोभिकरण केले आहे. अनावरणावेळी पुष्पवृष्टी करण्यात आली. गुरुवर्य अच्युतरावांच्या जुन्या आठवणींना काही माजी विद्यार्थ्यांनी उजाळा दिला. ब्रॉंझचा पूर्णाकृती पुतळा पाहून अनेकांनी आनंद व समाधान व्यक्त केले. गुरुवर्यांचा हा पुतळा सर्व विद्यार्थ्यांना नेहमी प्रेरणा देईल, असे या वेळी अनेकांनी मनोगतामध्ये सांगितले. माजी विद्यार्थी संघाची माहिती डॉ. नागवेकर यांनी दिली. अच्युतरावांच्या नावाने संघ यापुढेही भरीव कार्य करीत राहणार आहे, अशी ग्वाही दिली.या अनावरण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि. प. अध्यक्ष राजाभाऊ लिमये, माजी कुलगुरु डॉ. श्रीरंग कद्रेकर, डॉ. अलिमियॉं परकार, भारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार साळवी, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, जयू भाटकर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉ. दिलीप नागवेकर, अच्युतरावांचे सुपुत्र माजी शिक्षक रमेश पटवर्धन, मरीनर दिलीप भाटकर, भारत शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्ष नमिता कीर, पदाधिकारी, सेवानिवृत्त शिक्षक, माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.