
राजापूर-बालचित्रकला स्पर्धेत मुलांचा उत्साह
rat22p28.jpg-
77458
राजापूर ः केंद्रावर चित्रकला स्पर्धेत सहभागी विद्यार्थी.
बालचित्रकला स्पर्धेत मुलांचा उत्साह
राजापूर, ता. २२ : मनाच्या कोपऱ्यात साठविलेले क्षण रंगाच्या फटकाऱ्यामध्ये बालचमूने कॅनव्हासवर उतरविले. निमित्त होते सकाळने आयोजित राज्यस्तरीय सकाळ चित्रकला स्पर्धेचे. तालुक्यातील नवजीवन हायस्कूलच्या केंद्रावर आज झालेल्या स्पर्धेला विद्यार्थी स्पर्धकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सर्वच गटातील मुलांनी आपल्या मनातील विविध भावविष्कार पेन्सिलच्या साह्याने कागदावर उतरविला. स्पर्धेच्या यशस्वीततेसाठी नवजीवन हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्रकुमार व्हनमाने, कलाशिक्षक झीनत महाडीक, प्रा. प्रितम सुर्वे, शफिक वाघू, ओणी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. शिंदे, कलाशिक्षक काशिनाथ गुरव, भू हायस्कूलचे कलाशिक्षक सूर्यकांत पुजारी, पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील विशेष शिक्षक तन्वीर खान आदींचे सहकार्य लाभले.