केंद्रीय मंत्री राणे अचानक शाळेत; विद्यार्थ्यांचा घेतला तास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केंद्रीय मंत्री राणे अचानक शाळेत; विद्यार्थ्यांचा घेतला तास
केंद्रीय मंत्री राणे अचानक शाळेत; विद्यार्थ्यांचा घेतला तास

केंद्रीय मंत्री राणे अचानक शाळेत; विद्यार्थ्यांचा घेतला तास

sakal_logo
By

77472
नांदगाव : येथील शाळा नं.१ येथे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मुलांशी संवाद साधला. (छायाचित्र : अनिकेत जामसंडेकर)


केंद्रीय मंत्री राणे अचानक शाळेत; विद्यार्थ्यांचा घेतला तास

नांदगाव शाळेला भेट; मुलांचा आत्मविश्वास, समर्पक उत्तरे, कलाविष्कारांनी भारावले

नांदगाव, ता.२२ : केंद्रीय मंत्री नारायण राणे अचानकपणे नांदगाव येथील शाळा नं.१ मध्ये दाखल झाले. लागलीच त्‍यांनी विविध प्रश्‍न विचारून विद्यार्थ्यांचा तासही घेतला. बहुतांश प्रश्‍नांना आत्‍मविश्‍वासने उत्तर देत विद्यार्थ्यांनी राणेंकडून शाबासकीही मिळविली. मोठी स्वप्न बघा आणि मोठे व्हा, असा संदेशही श्री.राणे यांनी दिला.
सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्‍या केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी शनिवारी (ता.२१) मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्‍या नांदगाव शाळेला भेट दिली. यावेळी राणे यांनी विद्यार्थ्यांना देशाचे मुलांना सामान्य ज्ञानाचे प्रश्‍न विचारले. या सर्व प्रश्‍नांना मुलांनी आत्‍मविश्‍वासाने उत्तरे दिली. तासाभराच्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अभिनय, नृत्‍य यांचेही सादरीकरण केले. मुलांच्या या कलागुणांना राणेंनी उत्‍स्‍फूर्तपदे दाद दिली.
दरम्यान, राणे यांच्यासमवेत आमदार नितेश राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, खरेदी-विक्री संघ संचालक पंढरी वायंगणकर, उपसरपंच इरफान साटविलकर, मिलिंद मेस्त्री, डॉ. मिलिंद कुलकर्णी, माजी पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके, माजी सरपंच संजय पाटील, आफ्रोजा नावलेकर, निरज मोरये, हनुमंत वाळके, शिक्षक सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष नागेश मोरये, मुख्याध्यापक श्री. सुहास सावंत आदी उपस्थित होते.
--
मोठी स्वप्ने पाहा
केंद्रीय मंत्री राणे म्हणाले की, ‘‘येथील मुलांचा आत्मविश्वास पाहिला. खूप सुंदर, याही पुढे जात मुलांनी प्रगती करावी. मोठी स्वप्न पहावीत. तर शिक्षक वृंदानी ज्ञानेश्वर माऊली, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, पं.जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी यांचे विचार आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. ढोलकी वादन करणारा ईशांत मारुती मोरये याचेही राणे यांनी विशेष कौतुक केले.