खोटा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खोटा अहवाल देणाऱ्या
अधिकाऱ्यांवर कारवाई करा
खोटा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा

खोटा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा

sakal_logo
By

खोटा अहवाल देणाऱ्या
अधिकाऱ्यांवर कारवाई करा

जयंत बरेगार; अन्यथा २६ पासून उपोषण

सावंतवाडी, ता. २३ ः लेखी पुराव्यासह केलेल्या अर्जावर एफआयआर दाखल करण्यास तब्बल १३ महिन्यांचा विलंब केला असल्याचा आरोप करत वरिष्ठांना खोटा अहवाल देणाऱ्या तत्कालीन कुडाळ पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांवर फौजदारी व महाराष्ट्र नागरी सेवेखालील तरतुदीनुसार कारवाई न झाल्यास २६ जानेवारीपासून बेमुदत उपोषणाला बसू, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी दिला. पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांना तसे निवेदनही दिले.
निवेदनात म्हटले आहे की, ७ एप्रिल २०२१ च्या अर्ज व एफआयआरच्या चौकशीकामी आरोपींना वाचविण्याच्या प्रयत्नांमुळे विलंब होत असल्याचे लक्षात आल्याने बरेगार यांनी याबाबत जिल्हा पोलिसांकडे १७ जून २०२२ ला तक्रार दाखल केली होती. त्यानुषंगाने उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी थातूरमातूर चौकशी करून कारवाई करण्याचे टाळले होते. याबाबत विद्यमान जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्याकडे ११ ला अर्ज केला आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून २५ जानेवारीपर्यंत तत्कालीन पोलिस निरीक्षक व अन्य एका अधिकाऱ्यावर विभागीय चौकशीचे आदेश द्यावेत. तसेच माझा जबाब न घेता मी जबाब देण्यास नकार दिल्याचा असा खोटा अहवाल सादर करणाऱ्या पोलिस हेड कॉन्स्टेबल यांच्यावर विभागीय चौकशी तसेच फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. येत्या २५ पर्यंत कारवाई न झाल्यास नाईलाजाने २६ पासून गुन्हा दाखल होईपर्यंत उपोषणाला बसण्याचा इशारा बरेगार यांनी दिला आहे.