
रत्नागिरी-रत्नागिरी, चिपळुणात पेंशनधारक संघटनेची सभा
रत्नागिरी, चिपळुण येथे
पेंशनधारक संघटनेची सभा
रत्नागिरी, ता. २३ः कर्मचारी, पेंशन योजनेच्या पेंशन वाढीसाठीचा २०१६ च्या आरी ग्रुप केसचा निकाल सुप्रिम कोर्टाने ४ फेब्रुवारी २०२२ ला दिला. त्या निकालात सप्टेंबर २०१४ च्या आधीच्या पेंशनररना व त्यानंतरच्या ही पेंशनरना वाढीव पेंशन मिळणार आहे. असे असतानाही त्या निकालाचा चुकीचा अर्थ काढून भविष्य निर्वाह निधी संघटनेने पेंशनराना काहीही द्यायचे नाही. या निकालाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कर्मचारी पेंशन योजना १९९५ पेंशनधारक कल्याणकारी संस्था राष्ट्रीय संघटना अहमदनगरचे अध्यक्ष विश्वास सोनावणे, सचिव आर. बी. रोहकले हे उपस्थित राहणार आहेत. रत्नागिरी, लांजा, देवरुख, राजापूर येथील पेंशनराची सभा २८ जानेवारीला सकाळी ११ वाजता शिक्षक पतपेढी सभागृहात होईल. दापोली, मंडणगड, गुहागर, खेड, चिपळूण यांची सभा २९ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता चिपळूण खेर्डी येथे होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे उपाध्यक्ष संजय नागवेकर, रामचंद्र भोजे, व्ही. टी. शिंदे, सुरेश टोपरे आदींनी केले आहे.