
चोरीप्रकरणी एकाला जामिन
चोरीप्रकरणी एकाला जामिन
ओरोस ः भोगवे येथील एका हॉटेल समोरील समुद्राकडील दगडी कुंपण जेसीबीच्या सहाय्याने पाडून जमिनीत अतिक्रमण करून लॉन कटरची चोरी केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणारा संशयित आरोपी अशोक शिऊ राठोड (रा. विजापूर, सध्या रा. वेंगुर्ले) याची जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका यांनी १५ हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर मुक्तता केली. संशयितातर्फे ॲड. विवेक मांडकुलकर, ॲड. प्रणाली मोरे, ॲड. भुवनेश प्रभुखानोलकर, ॲड. प्रज्ञा पाटील यांनी काम पाहिले. याबाबत २१ नोव्हेंबरला फिर्याद दिली होती. त्यानुसार संशयितांवर गुन्हा दाखल होता. या प्रकरणातील संशयित अशोक राठोडला ८ डिसेंबरला न्यायालयात हजर केले असता संशयिताची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. त्यानंतर संशयित न्यायालयीन कोठडीत होता. न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. संशयितांतर्फे ॲड. विवेक मांडकुलकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून त्याची १५ हजार रुपयांच्या सशर्त जामीनावर मुक्तता करण्यात आली.