
वेंगुर्लेत रुग्णांना ब्लॅंकेट वाटप
वेंगुर्लेत रुग्णांना ब्लॅंकेट वाटप
वेंगुर्ले ः तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील रेडी, शिरोडा, वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालय, संजीवनी हॉस्पिटल येथील ३८ रुग्णांना ब्लॅंकेटचे वाटप केले. युवती सेना जिल्हा विस्तारक रुची राऊत यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला. यावेळी वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, शहरप्रमुख अजित राऊळ, माजी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, माजी नगरसेवक तुषार सापळे, युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, युवासेना उपशहरप्रमुख कौशल मुळीक, महिला उपशहर संघटक मंजुषा आरोलकर, संदीप पेडणेकर, दिलीप राणे, आपा साळगावकर, काशिनाथ नार्वेकर, सुधाकर राणे, शिरोडा सरपंच लतिका रेडकर, सुनील सातजी, युवती सेना तालुकाधिकारी वडर, वंदना कांबळी, सायली पोखरणकर, समृध्दी कुडव, संतोष कुडव, नंदिनी धानजी, पांडुरंग नाईक, संदीप गावडे, अशोक नाईक आदी उपस्थित होते.