पंधरवडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंधरवडा
पंधरवडा

पंधरवडा

sakal_logo
By

rat२४१२.txt

बातमी क्र..१२ ( टुडे पान ३ )

rat२४p५.jpg ः
७७९३८
हर्णै ः विद्यार्थ्यांना प्रबोधन करताना कीर्तनकार तेजस जोशी.

शनिवारपर्यंत ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’

हर्णै ः आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन दापोली संचलित वराडकर-बेलोसे महाविद्यालय दापोली मराठी विभागतर्फे १० ते २८ जानेवारी या कालावधीत ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.
या पंधरवड्यामध्ये महाविद्यालयामध्ये विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. यामध्ये सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, व्याख्याने, घोषवाक्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, भित्तीपत्रक स्पर्धा इत्यादीचे आयोजन करण्यात आले आहे. १९ जानेवारीला दापोली तालुक्यातील सुप्रसिद्ध शेतकरी, व्यावसायिक, कीर्तनकार तेजस जोशी, गाव आंजर्ले, मुर्डी गाव यांचे व्याखान आयोजित करण्यात आले होते. व्याख्यानासाठी संतसाहित्य, कीर्तन परंपरा, त्याचे महत्व व गरज हा विषय होता. या व्याख्यानातून त्यांनी संतांचे योगदानाचे महत्व विषद केले. संत तुकाराम, संत एकनाथ, संत रामदास यांच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक कार्याचा आढावा घेतला. ओवी, अभंग, आर्या व ग्रंथ यांचे वाचन कसे करावे, अभ्यास कसा करावा. समाजप्रबोधनासाठी कीर्तन प्रवचनाची आवश्यकता सांगितली. समाजातील अनिष्ट, रूढी, परंपरा घालवून मोबाईलचा वापर आवश्यक तेवढाच करावा. फेसबुक, व्हॉट्सअॅपवरच्या प्रतिक्रिया अभ्यासाशिवाय देऊ नयेत. या कार्यक्रमाप्रसंगी मराठी विभागप्रमुख प्रा. उत्तम पाटील, प्रा. दीपक गडकर आदी प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
-----
rat२४p६.jpg ः
७७९३९
साखरपा ः कार्यक्रमात सुरेश तळवलकर, गिरीधर कुलकर्णी आणि रमा कुलकर्णी.

स्वरूप संगीत विद्यालयाचा गुरूपूजन सोहळा
साखरपा ः गिरीधर कुलकर्णी संचलित स्वरूप संगीत विद्यालयाचा गुरूपूजन सोहळा तस्मै श्री नुकताच पार पडला. पद्मश्री तालयोगी पंडित सुरेश तळवळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमास रसिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमात पंडित सुरेश तळवळकर यांनी बहुमुल्य मार्गदर्शन केले. संगीत, स्वर, लय-ताल विचार या विषयी आपले मौल्यवान विचार प्रगट करून पंडितजींनी विद्यार्थ्यांना, पालकांना व श्रोत्यांना मार्गदर्शन केले. कोल्हापूरहून गेली २० वर्षे सातत्याने देवरूखात येऊन अखंड विद्यादान करून विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या गिरीधर कुलकर्णी यांच्या कार्याचा पंडितजींनी गौरवपूर्ण उल्लेख केला आणि आशीर्वाद दिले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन स्वरूप संगीत विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत परिश्रमाने व नेटके केले. या संपूर्ण कार्यक्रमात गिरीधर कुलकर्णी, नितीन मुनीश्वर, अमोघ पेंढारकर यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अप्पा आठल्ये यांनी केले. कार्यक्रमास रत्नागिरी देवरूख व पंचक्रोशीतील रसिकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--

rat२४p७.jpg ः
७७९४०
साखरपा ः लावणीच्या तालावर कुणाल पाटील यांच्याबरोबर पदन्यास करताना जिल्हा कृषी अधिकारी प्रकाश सूर्यवंशी.

लावणीवर थिरकला सागलीतील अधिकारी

साखरपा ः लावणी हा पारंपरिक लोकसंगीत प्रकार. आजवर अनेक कलाकारांनी आपली कारकीर्द या कलाप्रकारात घडवली; पण अनेक रसिकांनाही ही लावणी भुरळ पाडत असते. सांगली येथे नुकत्याच हृदयस्पंदन क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सांगली जिल्हा कृषी विभागातर्फे हा महोत्सव भरवण्यात आला होता. त्यात रत्नागिरीजवळील कासारवेली गावचे युवा कलाकार कुणाल पाटील यांच्या लावणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. कुणाल हे स्त्री वेशभूषा परिधान करून लावणी सादर करतात. कथ्थक या नृत्य प्रकाराचे शिक्षण घेतलेले कुणाल हे नखरेल नार उडावी लावणीचा बार हा स्वत:चा कार्यक्रम सादर करतात. स्थानिक नृत्य कलाकारांना हाताशी घेऊन त्यांनी आजवर या कार्यक्रमाचे ३००च्या वर प्रयोग केले आहेत. कुणाल पाटील हे जिल्हा कृषिसंघात नोकरी करतात. सांगली येथे पार पाडलेल्या क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवात कला सादरीकरणासाठी निमंत्रित करण्यात आले होते. या वेळी स्टेजवरून स्त्री वेशात लावणी सादर करत असताना जिल्हा कृषी अधिकारी प्रकाश सूर्यवंशी यांना त्या लावणीची भुरळ पडली आणि स्वत:ला नृत्य करण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी थेट स्टेजवर येत कुणाल यांच्याबरोवर ठेका धरला आणि पदन्यास केले. कुणाल यांनी लावणी सादरीकरणात मिळवलेल्या प्राविण्याबद्दल सूर्यवंशी यांनी त्यांचे भरभरून कौतुक केले.
--

rat२४p४.jpg ः
७७९३७
पावस ः शिवसेना शाखा पावस व वंदन जीवनदान ग्रुप रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांना प्रमाणपत्र देताना.

शिबिरात ३६ रक्तदात्यांचा सहभाग

पावस ः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना शाखा पावस आयोजित व रत्नागिरीच्या जीवनदान ग्रुप यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले. यामध्ये ३६ जणांनी रक्तदान केले. शिवसेना शाखेच्यावतीने पावस येथील स्वरूपाश्रम येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जीवनदान ग्रुपचे सर्व कर्मचारी या शिबिराला उपस्थित होते. रक्तदात्यांनी रक्तदान केल्यामुळे या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. या वेळी पावस विभागप्रमुख किरण तोडणकर यांच्या आवाहनाला शिवसैनिकांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे शिबिर चांगल्या तऱ्हेने पार पडले. या वेळी विविध पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

--

विजयदुर्ग किल्ल्यातील तटबंदी ढासळतेय

सिंधुदुर्ग ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यातील तटबंदीला असलेले बुरूज ढासळत आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेल्या जलदुर्गामध्ये सर्वात जुना जलदुर्ग म्हणून विजयदुर्ग किल्ला ओळखला जातो. किल्ल्याच्या बांधणीला सुमारे ८०० वर्षे पूर्ण होत आहेत. तीनही बाजूने समुद्राच्या लाट्यांचा मारा कित्येक वर्षे होत आहे. यामध्ये काही भागातील तटबंदी, बुरूज ढासळू लागली आहेत. या किल्ल्याची डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे लेखी पत्राद्वारे देवगड तहसीलदारांमार्फत देवगड तालुका व्यापारी पर्यटन विकास समिती देवगड यांच्यावतीने करण्यात आली आहे.
----