‘जेट टॉय’मध्ये बिबवणे विद्यालय प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘जेट टॉय’मध्ये बिबवणे विद्यालय प्रथम
‘जेट टॉय’मध्ये बिबवणे विद्यालय प्रथम

‘जेट टॉय’मध्ये बिबवणे विद्यालय प्रथम

sakal_logo
By

78014
बिबवणे ः ‘अ वर्ल्ड इन मोशन’ शैक्षणिक स्पर्धेतील विजत्यांसह उपस्थित मान्यवर.


‘जेट टॉय’मध्ये बिबवणे विद्यालय प्रथम

नेरुरपारमध्ये स्पर्धा; महिंद्रा अँड महिंद्रा, एसएईचा पुढाकार

तळेरे, ता. २४ : एसएई आणि महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अ वर्ल्ड इन मोशन’ या शैक्षणिक उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या ‘जेट टॉय’ स्पर्धेत लक्ष्मीनारायण विद्यामंदिर, बिबवणे शाळेने प्रथम, तर शिवाजी माध्यमिक विद्यालय, काळसेने द्वितीय क्रमांक पटकावला. प्रथम क्रमांक विजेत्या बिबवणे संघाची पुणे येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना इंजिनियरिंगची आवड निर्माण व्हावी व शैक्षणिक प्रगती होण्यासाठी महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचे व्यवस्थापक सुबोध मोरे यांनी हा उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांसाठी उपलब्ध करून दिला आहे. तत्पूर्वी या स्पर्धेचा प्रारंभ काळसे हायस्कूलचे मुख्याध्यापक पेडणेकर आणि वसुंधरा विज्ञान केंद्राचे अध्यक्ष सतीश नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. कुडाळ-नेरुरपार येथील वसुंधरा विज्ञान केंद्र येथे झालेल्या या अनोख्या कार्यक्रमात विदयार्थ्यांनी आपली संशोधन वृत्ती आणि कल्पकतेचे अनोखे दर्शन घडविले. व्यावसायिक, सामाजिक जबाबदारी उपक्रमांतर्गत सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘अविम’ उपक्रमाचे आयोजन केले होते. या अंतर्गत विद्यार्थ्यांना सारख्याच प्रमाणात पुरविलेल्या साहित्याच्या माध्यमातून जेय टॉय करण्याची स्पर्धा झाली. तयार केलेल्या प्रकल्पांची त्यांच्या अधिकतम क्षमतांच्या मूल्यमापनाच्या आधारे निवड करण्यात आली. त्यात अधिकाधिक अंतर चालणे, वजन वाहून नेणे, ठरलेल्या ठिकाणी थांबणे, जलद गतीने चालणे अशा चाचण्या व भविष्यातील इंजिनियरिंगमधील आव्हाने, त्यावरील इनोव्हेटिव्ह आयडीया सादरीकरणाचा समावेश होता. या स्पर्धेत सावंतवाडी, कुडाळ, मालवण या तालुक्यांतील प्राथमिक व माध्यमिक अशा ११ शाळांनी सहभाग घेतला. यांना शिक्षक आणि महिंद्राच्या स्वयंसेवकांचे सहकार्य मिळाले. यावेळी महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे अधिकारी समीर वंजारे, संजय मालप, समीर माडये, शिक्षक आदी उपस्थित होते.