विज्ञान मंडळाचे ज्ञानवृद्धीसाठी पाऊल
ज्ञानवृद्धीसाठी विज्ञान मंडळ सरसावले

विज्ञान मंडळाचे ज्ञानवृद्धीसाठी पाऊल ज्ञानवृद्धीसाठी विज्ञान मंडळ सरसावले

Published on

78010
सावंतवाडी ः वैज्ञानिक सहलीत सहभागी विज्ञान शिक्षक.


विज्ञान मंडळाचे ज्ञानवृद्धीसाठी पाऊल

अनोखा उपक्रम; शिक्षकांचा गोव्यात अभ्यास दौरा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २४ ः सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळातर्फे रविवारी एक दिवसीय वैज्ञानिक सहलीचे आयोजन गोवा येथे करण्यात आले. या अभ्यास दौऱ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध माध्यमिक शाळांमधील ३६ विज्ञान शिक्षक सहभागी झाले होते.
अभ्यास दौऱ्यासाठी पणजी येथील गोवा विज्ञान केंद्र, आयसीएआर व विज्ञान भारती या संस्थांचे सहकार्य लाभले. विज्ञान भारतीचे गोवा विभाग प्रमुख प्रा. सुहास गोडसे यांनी सहभागी शिक्षकांना विज्ञान भारती संस्थेच्या विविध उपक्रमांबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांसाठी विज्ञान चित्रपट महोत्सव व शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या फिल्म मेकिंग कार्यशाळेबाबत माहिती दिली. भविष्यात या उपक्रमांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक विभागातील विज्ञान शिक्षकांना सहभागी होण्यासाठी आवाहन केले. गोवा विज्ञान केंद्राचे संचालक प्रा. विलास चौधरी यांनी हवेचा दाब या विषयावर कृतियुक्त प्रयोग सादर करून विविध संकल्पना स्पष्ट केल्या. केंद्रात मांडणी केलेल्या विविध वैज्ञानिक प्रात्यक्षिकांसह आकाशदर्शन व सजीवांच्या उत्क्रांतीवर आधारीत थ्रीडी शोचे आयोजन केले होते.
दरम्यान, यावेळी उपाध्यक्ष आर. के. कारेकर, सचिव प्रकाश कानूरकर, सहसचिव संतोष पवार, कोषाध्यक्ष राजाराम फर्जंद, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सत्यपाल लाडगावकर, चंद्रकांत चव्हाण, संजय शेवाळे, मिलिंद गावकर, अनंत साईल, सतीशकुमार कर्ले तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विज्ञान शिक्षक मंडळाच्या प्रतिनिधी शिक्षकांनी या चर्चासत्रात आपले विचार मांडले. कणकवली तालुकाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण यांनी या अभ्यास दौऱ्यासाठी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन केले. जिल्ह्यातील विज्ञान शिक्षकांच्या गुणवत्ता वाढीसाठी मंडळाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे माध्यमिक शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांच्यासह शैक्षणिक संस्थांकडून विशेष कौतुक होत आहे.
--
जलचरांविषयी घेतली माहिती
दुपारच्या सत्रात शिक्षकांनी ‘स्नो वर्ल्ड’चा मनमुराद आनंद लुटला. सायंकाळच्या सत्रात किनारी भागातील क्षेत्रभेटीत शंख, शिंपले व मासे आदी समुद्री जलचरांच्या विविध प्रजातींच्या जीवनचक्राविषयी माहिती घेतली. लवकरच वैज्ञानिक संकल्पनांची देवाण-घेवाण व दृढीकरण करण्यासाठी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या शेजारी राज्यांतील क्रियाशील विज्ञान शिक्षक एकत्र आणण्यासाठी आंतरराज्य फोरम स्थापन करणार असल्याचे जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com