नदीपूजन, प्रज्वलित केलेले दिवे सोडण्यात येणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नदीपूजन, प्रज्वलित केलेले दिवे सोडण्यात येणार
नदीपूजन, प्रज्वलित केलेले दिवे सोडण्यात येणार

नदीपूजन, प्रज्वलित केलेले दिवे सोडण्यात येणार

sakal_logo
By

rat२४८.txt

बातमी क्र. ८ ( पान २ साठी )

फोटोओळी
-rat२४p२४.jpg-
७७९९४
रत्नागिरी : पत्रकार परिषदेत माहिती देताना सुभाष लाड. सोबत दीपक नागवेकर.

नदीपूजनात प्रज्वलित दिवे सोडणार

तळवडेतील संमेलनाचे वैशिष्ट्य ; नदी प्लास्टिकमुक्तचा संकल्प


सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाच्या वतीने आठव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन येत्या १० ते १२ फेब्रुवारीदरम्यान तळवडे (ता. राजापूर) येथील प्रभावती मंगल कार्यालयात केले आहे. ग्रंथदिंडी, ग्रामीण भागात राहण्याचा आनंद, बैलगाडीतून अध्यक्षांची मिरवणूक राणी लक्ष्मीबाई यांच्या कोट गावातून क्रांतीज्योत आणण्यात येणार आहे. विशेष म्हणजे अर्जुना नदीकाठावर नदीपूजन करून प्रज्वलित केलेले दिवे सोडण्यात येणार असून नदी प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प करण्यात येणार आहे. अशी माहिती संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
लाड यांनी, १ मे १९५३ रोजी लांजा, राजापुरातील मंडळींनी एकत्र येऊन मुंबईत राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ स्थापन केला. मंडळाचे कार्य सतत सुरू आहे. तळवडे ग्रामवाचनालयाच्या मदतीने गुरुवर्य महादेव कुंडेकर साहित्य नगरीत १०, ११ व १२ फेब्रुवारीला संमेलन होणार आहे. संमेलनाचे अध्यक्षपद लोकमान्य वाचन मंदिराचे अध्यक्ष प्रकाश देशपांडे भूषवणार आहेत. या निमित्ताने लांजा, राजापूर तालुक्यातील साहित्य, शिक्षण, सामाजिक, कृषी, ग्रामीण महिला विकास या क्षेत्रात कार्यरत कर्तृत्ववान व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. डॉ. राहुल मराठे, कवी अरुण इंगवले, धीरज वाटेकर, सुनील कदम, अपूर्वा पाटील या साहित्यिक मार्गदर्शन करणार आहेत.

प्रदर्शनासह खाद्य पदार्थाचेही कक्ष...
आठव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनामध्ये पुस्तक प्रदर्शन, शस्त्र प्रदर्शन, चित्र प्रदर्शनासह महिला बचत गटांचे खाद्य पदार्थांचे विक्री कक्षही ठेवण्यात येणार आहेत.