Tue, Jan 31, 2023

मराठी भाषा पंधरवडा
२८ जानेवारी पर्यंत
मराठी भाषा पंधरवडा २८ जानेवारी पर्यंत
Published on : 24 January 2023, 5:08 am
मराठी भाषा पंधरवडा २८ पर्यंत
सिंधुदुर्गनगरी ः मराठी भाषा संवर्धन पंधरवडा १४ ते २८ जानेवारी २०२३ या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन २३ ला लेखक सतिश लळीत यांच्या हस्ते झाले. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ग्रंथप्रदर्शन २३ पासून (सार्वजनिक सुटी वगळता) २८ जानेवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आयोजित केले आहे. तरी शासकीय कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच वाचक सभासद यांनी ग्रंथप्रदर्शन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन बा. हजारे यांनी केले आहे.