कणकवली : सप्ताह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : सप्ताह
कणकवली : सप्ताह

कणकवली : सप्ताह

sakal_logo
By

kan२५२.jpg - भिरंवडे रामेश्‍वर मंदिर

७८१३५

भिरंवडे रामेश्‍वर मंदिरात
शनिवारपासून हरिनाम सप्ताह
कणकवली, ता. २५ ः सिंधुदुर्गातील जागृत देवस्थान भिरंवडे येथील रामेश्‍वर मंदिरात २८ जानेवारी ते ४ फेब्रुवारीदरम्यान अखंड हरिनाम सप्ताह साजरा होणार आहे. यंदा विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून, भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन देवालय संचालक मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले आहे.
भिरंवडे येथील रामेश्‍वर मंदिराचा परिसर हा पर्यटनक्षेत्र म्हणून विकसित केले आहे. परिसरात गर्द वनराई आणि भव्य असे भक्तनिवास, बालोद्यान आहे. सुसज्ज पार्किंग सुविधा आहे. या मंदिरात श्रीदेव रामेश्‍वरांच्या वार्षिक अखंड हरिनाम सप्ताहात २९ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत दुपारी एक ते तीनपर्यंत महाप्रसाद, तर रात्री ढोल-ताशांच्या गजरात श्रीदेव रामेश्‍वराची पालखी प्रदक्षिणाचा कार्यक्रम होणार आहे. रामेश्‍वर मंदिरात शनिवारी (ता. २८) दुपारी दोनला घटस्थापना होईल. सायंकाळी सातला पोखरण येथील हरिपाठ आणि वारकरी भजन होणार आहे. रविवारी (ता. २९) रात्री नऊला श्री लिंगेश्वर पावणादेवी दिंडी नृत्य भजन मंडळ- सातरल, सोमवारी (ता. ३०) रात्री नऊला वारकरी भजन- वेंगुर्ला, मंगळवारी (ता. ३१) दुपारी बाराला बुवा गिरीश घाडीगावक- हरकुळ बुद्रुक यांचे भजन, सायंकाळी सातला पोखरण येथील गजानृत्य, रात्री नऊला भजन बुवा शशिकांत राणे- जानवली, दहाला बुवा हेमंत तेली- फोंडाघाट यांचे भजन सादर होणार आहे. बुधवारी (ता. १) सकाळी अकराला महाला भजन- भिरवंडे, दुपारी साडेबाराला सदगुरू श्री वामनराव पै प्रणित उपासना यज्ञ, हरिपाठ व संगीत जीवनविद्या, सादरकर्ते- जीवनविद्या मिशन, शाखा- कणकवली, रात्री साडेनऊला चित्ररथ- बाल शिवाजी स्कूल- कणकवली, रात्री दहाला संगीत भजन प्रसिद्ध बुवा संदीप लोके- लिंगडाळ. गुरुवारी (ता. २) दुपारी बाराला महिला भजन- मुंबई, सायंकाळी पाचला भजन- वारकरी संप्रदाय- कणकवली, गणेश मंदिर- एसटी वर्कशॅाप, रात्री नऊला महिला भजन- चाफेड, रात्री दहाला चित्ररथ- प्राथमिक केंद्रशाळा- भिरवंडे, शुक्रवारी (ता. ३) दुपारी बाराला गीतरामायण- विनोद गोखले, एकला संगीत भजन- बुवा केदार कोदे (दत्तप्रसाद भजन मंडळ- वरवडे), रात्री नऊला भजन, बुवा प्रकाश चिले (विष्णू स्मृती मंडळ, डोंबिवली), रात्री साडेदहाला चित्ररथ- माध्यमिक विद्यामंदिर- कनेडी, शनिवारी (ता. ४) दुपारी दोनला अखंड हरिनामाची सांगता होणार आहे.