Thur, Feb 9, 2023

कणकवलीत आज
‘डबलबारी’ सामना
कणकवलीत आज ‘डबलबारी’ सामना
Published on : 25 January 2023, 12:09 pm
कणकवलीत आज
‘डबलबारी’ सामना
कणकवली ः शहरातील लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्स येथे उद्या (ता. २६) रात्री नऊला डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित केला आहे. सकाळी दहाला महापूजा, दुपारी दीडे ते तीन दरम्यान महाप्रसाद, रात्री नऊला श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, ओरोस खुर्दचे बुवा ज्ञानदेव मेस्त्री व श्री पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ, तोंडवलीचे बुवा संतोष मिराशी यांच्यात आमने-सामने डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार आहे. भजन रसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.