पिंगुळीत रविवारपासून विविध कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंगुळीत रविवारपासून विविध कार्यक्रम
पिंगुळीत रविवारपासून विविध कार्यक्रम

पिंगुळीत रविवारपासून विविध कार्यक्रम

sakal_logo
By

78262
प. पू. राऊळ महाराज
78263
प.पू. अण्णा राऊळ महाराज

पिंगुळीत रविवारपासून विविध कार्यक्रम

प. पू. राऊळ महाराज पुण्यतिथी; धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम

कुडाळ, ता. २५ ः प. पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांचा ३८ वा पुण्यतिथी उत्सव महारुद्र स्वाहाकार अनुष्ठानसहित २९ ते २ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केला आहे. या निमित्ताने पिंगुळी येथील प. पू. राऊळ महाराज समाधी मंदिर येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
२९ ला पहाटे साडेपाचला काकड आरती, सकाळी ८ ते १० समाधीस्थानी सार्वजनिक अभिषेक, दुपारी साडेबाराला आरती, १ ते रात्री ११ महाप्रसाद, दुपारी तीनला हळदी-कुंकू समारंभ, सायंकाळी चार ते रात्री बारापर्यंत जिल्हास्तरीय भजन स्पर्धा. ३० ला सकाळी ८ ते १० मोफत कृत्रिम जयपूर फूट मोजमाप शिबिर व इतर कार्यक्रम होतील. सायंकाळी पाचला भजन, सातला चक्री कीर्तन, (बाल युवा कीर्तनकार, गोव्याचे प्रसिद्ध कीर्तनकार सुहास वझे यांचे गोमंतक संत मंडळ संचालित कीर्तन विद्यालय फोंडा, गोवा येथील विद्यार्थी, शिष्यगण) यामध्ये ह. भ. प. समीक्षा कुर्टीकर, सना साटेलकर, सावली गावकर, मनस्वी नाईक, शारदा आरोंदेकर यांना साथ संगत बबन आरोंदेकर, दामोदर कामत, कीर्तनकार सुहास वझे (सर्वजण गोवा). रात्री १० वाजता श्री देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी यांचे भजन (बुवा रुपेश यमकर, पखवाज शुभम गावडे, तबला साईप्रसाद नाईक, पिंगुळी), ३१ ला (मुख्य दिवस) पहाटेपासून धार्मिक विधी (यजमान : राऊळ महाराज परिवार). नऊला डॉ. अनंत सामंत (एम. डी. आयुर्वेद) अद्वैत चिकित्सालय, पिंगुळी यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर (स्थळ : दत्त मंदिर), न्युरोपॅथी फ्री चेकअप, सकाळी अकराला गडेकर यांच्या नेतृत्वाखालील दामोदर बोडगेश्वर दिंडी भजन पथक वास्को, गोवा यांची दिंडी, दुपारी १२.३० ते १ श्रींची महाआरती, १ ते १.१० वा. पू. बाई मा यांच्या हस्ते ‘सद्गुरू समर्थ राऊळबाबा’ विशेषांक प्रकाशन, सायंकाळी ५ ते ७ ‘रघुकुल स्वरविहार’ सावंतवाडी प्रस्तुत भक्तिरंग (गायिका ईश्वरी तेजम, ऋचा कशाळीकर, श्रुती सावंत, साथसंगत तबला-प्रसाद मेस्त्री, पखवाज-आनंद मोर्ये, संवादिनी-उमेश परब, सौजन्य : महेश धुरी, महेंद्र कुडकर), सायंकाळी पालखी मिरवणूक, राऊळवाडी पिंगुळी यांच्या दिंडीचे आगमन, रात्री अकराला दशावतारी नाट्यप्रयोग. १ फेब्रुवारीला विविध कार्यक्रम होतील. दुपारी महाप्रसाद, दुपारी १ ते ३ अनुभूती कथन (आयोजक-माया मांजरेकर, सूत्रसंचालन-आशा गुरव, मुंबई). संगीत भजन कोकणरत्न संतोष शिरसेकर, मुंबई, दुपारी ३ ते ५ संगीत भजन (संतोष शिरसेकर मुंबई), सायंकाळी भाऊ नाईक-वेतोरे यांचे प. पू. राऊळ महाराज जीवन चरित्रावर आधारीत कीर्तन, रात्री नऊला समईनृत्य. २ ला विविध धार्मिक कार्यक्रम, सकाळी साडेआठला श्री. प. पू. सद्गुरू समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिर येथे लघुरुद्र आदी विधी होतील. दुपारी १ ते रात्री ११ अखंड महाप्रसाद, दुपारी १ वाजता सुभाष आबा नलावडे, आजरा प्रस्तुत श्री. प. पू. सद्गुरू समर्थ राऊळ महाराज पंचक्रोशी भक्तमंडळ आजरा (जि. कोल्हापूर) यांच्या दिंडीचे आगमन, सायंकाळी सद्गुरू समर्थ राऊळ महाराज पंचक्रोशी भक्तमंडळ, आजरा यांचा सांस्कृतिक कलाविष्कार, रात्री दहाला ‘अमृतमोहिनी’ नाट्यकलाकृती आदी कार्यक्रम होतील. श्री. प. पू. सद्गुरू समर्थ श्री राऊळ महाराज यांचा १९८५ नंतर तिथी आणि दिनांक असा एकाच दिवशी पहिल्यांदाच येणारा यावेळचा ३८ वा पुण्यतिथी उत्सव विविध कार्यक्रमांनी होत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा, असे आवाहन ट्रस्टचे विठोबा दशरथ राऊळ यांनी केले आहे.