हर्णै-सुधारित जोरदार वाऱ्याने मच्छीमारांची धावपळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हर्णै-सुधारित जोरदार वाऱ्याने मच्छीमारांची धावपळ
हर्णै-सुधारित जोरदार वाऱ्याने मच्छीमारांची धावपळ

हर्णै-सुधारित जोरदार वाऱ्याने मच्छीमारांची धावपळ

sakal_logo
By

७८३०६
७८३०७

पान १


जोरदार वाऱ्याने मच्छीमारी ठप्प
मच्छीमारांना फटका; हजारो नौकांनी घेतला बंदरात आसरा
हर्णै, ता. २५ ः पुन्हा एकदा वाऱ्याने मच्छीमारांचे तोंड फोडले आहे. गेले दोन ते तीन दिवसांपासून उत्तरेकडील वाऱ्यामुळे मच्छीमार नौकांची धावपळच उडाली आहे. मिळेल त्या खाडीत, बंदरात नौकांनी आसरा घेतल्यामुळे मासेमारी पुन्हा एकदा थांबली आणि बंदरात ताज्या मासळीची आवकच थांबली. सातत्याने सलग चार दिवस हा वारा सुरू असल्याने मच्छीमार बांधवांना कधी हा वारा थांबणार? याची चिंता लागून राहिली आहे.
गेल्या आठवड्यातदेखील हीच परिस्थिती निर्माण झाली होती. सतत दोन दिवस सोसाट्याचा वारा सुटला होता. १४ व १५ जानेवारी या दोन दिवशी किनारपट्टीला उत्तरेकडील वाऱ्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले होते. अतिशय वेगाने वारे वाहू लागल्याने हर्णै बंदरातील बाहेर खोल समुद्रात मासेमारीकरिता गेलेल्या नौकांनी जयगड, रत्नागिरी, दाभोळ, आंजर्ले, हर्णै बंदरात तर काहींनी दिघी खाडीमध्ये सुरक्षिततेसाठी आसरा घेतला. २२ ते २३ जानेवारीपासून नौका प्रचंड वेगवान वाऱ्यामुळे बंद आहेत. जयगडमध्ये १००, बोऱ्या करूळमध्ये ५०, दाभोळमध्ये ५०, हर्णै बंदरात सुमारे ४०० ते ५०० आणि बाकी सर्व १५० नौका आंजर्ले खाडीत तर दिघी खाडीत ५० नौकांनी आसरा घेतला आहे आणि त्यामुळे बंदरात मासळीच नाही.
गेले चार दिवस मासळी बंदमुळे बंदरात मासळीच नाही. त्यामुळे सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस होणारा मोठा लिलावच बंद झाला आहे. बंदरात मासळीचा शुकशुकाट झाला आहे. आता पुढे सलग चार दिवस सुट्ट्या येत आहेत. पर्यटक मोठ्या संख्येने येणार आहेत. मात्र, बंदरात मासळीच नसल्याने पर्यटक नाराज होणार आहेत.

कोट
गेल्या आठवड्यातही असाच वारा सुटल्यामुळे मासेमारी दोन ते तीन दिवस बंदच होती आणि आता परत गेले चार दिवस बंद आहे. लाखो रुपयांचे नुकसान कोण भरून काढणार. सरकार आमच्याकडे लक्षच देत नाही. सरकारने ओला दुष्काळ तरी जाहीर करावा. समुद्रात अवैध मासेमारी बेसुमार चालूच आहे. त्यावर तरी कडक कारवाई व्हायला हवी.
- दत्ताराम पावसे, मच्छीमार, हर्णै