‘कोमसाप’च्या भरत गावडेंना ‘वाङमयीन कार्यकर्ता’ पुरस्कार ‘कोमसाप’च्या भरत गावडेंना ‘वाङमयीन कार्यकर्ता’ पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘कोमसाप’च्या भरत गावडेंना 
‘वाङमयीन कार्यकर्ता’ पुरस्कार
‘कोमसाप’च्या भरत गावडेंना 
‘वाङमयीन कार्यकर्ता’ पुरस्कार
‘कोमसाप’च्या भरत गावडेंना ‘वाङमयीन कार्यकर्ता’ पुरस्कार ‘कोमसाप’च्या भरत गावडेंना ‘वाङमयीन कार्यकर्ता’ पुरस्कार

‘कोमसाप’च्या भरत गावडेंना ‘वाङमयीन कार्यकर्ता’ पुरस्कार ‘कोमसाप’च्या भरत गावडेंना ‘वाङमयीन कार्यकर्ता’ पुरस्कार

sakal_logo
By

78769
भरत गावडे

‘कोमसाप’च्या भरत गावडेंना
‘वाङमयीन कार्यकर्ता’ पुरस्कार

कुडाळच्या संमेलनात आज होणार वितरण

सावंतवाडी, ता. २८ ः कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग शाखेचा यावर्षीचा वाङमयीन कार्यकर्ता पुरस्कार ‘कोमसाप’च्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी सलग तीन वर्षे असताना सर्वोत्कृष्ट कार्य केलेल्या भरत गावडे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण उद्या (ता. २९) ‘कोमसाप’च्या कुडाळ येथे होणाऱ्या ‘भाकरी आणि फूल’ कवी संमेलन व जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
भरत गावडे १९९९ पासून गेली २५ वर्षे कोमसापचे सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. कोमसापच्या जिल्हा व तालुका शाखेच्या विविध साहित्यिक कार्यक्रमांतही त्यांचा सक्रिय सहभाग असतो. विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण व्हावी, यासाठी त्यांनी २०१३ पासून विद्यार्थी साहित्य संमेलने, लेखक आपल्या भेटीसाठी असे अनेक अभिनव उपक्रम राबविले. कोमसापच्या माध्यमातून त्यांनी मराठी भाषा विकास कौशल्य, वक्तृत्व, वाचन संस्कृती, ग्रंथ प्रदर्शन, उपयोजित लेखन, कथाकथन व काव्य लेखन कार्यशाळा, पाठ्यपुस्तकातील लेखकांशी पत्र लेखनातून गाठी भेटी असे विविध उपक्रम राबविले. बॅ. नाथ पै, पुण्यश्लोक बापुसाहेब महाराज यांच्या जीवन चरित्रावर अनेक शाळांमध्ये व्याख्याने देऊन त्यांच्या कार्याचा जागर केला. तसेच स्वखर्चाने पाच शाळांना सुधा मूर्ती यांची पुस्तके देऊन वाचन संस्कृती वाढविण्यासाठी नेहमी प्रोत्साहन दिले. दाणोली वाचनालयाचे अध्यक्ष म्हणून उत्कृष्ठ कार्य करताना निवृत्तीनंतरही शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रांत योगदान देत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन निवड समितीचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, सचिव विठ्ठल कदम, रुजारीओ पिंटो, सुरेश ठाकूर, वृंदा कांबळी, अॅड. संतोष सावंत यांनी ही निवड केली.