संगमेश्वर-शिक्षण परिषदेतून बदलत्या अभ्यासक्रमाची माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संगमेश्वर-शिक्षण परिषदेतून बदलत्या अभ्यासक्रमाची माहिती
संगमेश्वर-शिक्षण परिषदेतून बदलत्या अभ्यासक्रमाची माहिती

संगमेश्वर-शिक्षण परिषदेतून बदलत्या अभ्यासक्रमाची माहिती

sakal_logo
By

बदलत्या अभ्यासक्रमाची
शिक्षण परिषदेतून माहिती
विनायक पाध्ये; गोळवली टप्पा येथे शिक्षण परिषद
संगमेश्वर, ता. २८ः दर काही वर्षांनी बदलणारा अभ्यासक्रम, त्यातील अध्यापनाचा महत्वाचा सारांश, ज्ञान रचनावादी शिक्षण, बदललेली परीक्षापद्धती म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन याबाबत केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत मार्गदर्शन करण्यात आले.
गोळवली टप्पा येथे तुरळ केंद्रस्तरीय शिक्षण परिषद झाली. त्यामध्ये कडवई प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी विनायक पाध्ये यांनी मार्गदर्शन केले.
या मूल्यमापनाचा खरा हेतू समजावून घेऊन आकारिक व संकलित गोष्टीतून वस्तुनिष्ठ सृजनशीलता घडून यावी व अशा सृजनशीलतेसाठीच प्रत्येक केंद्रातून शिक्षण परिषदेचे विविध विषयांवर आधारित आयोजन करण्यात येते. या मूल्यमापनाबाबतची वस्तुनिष्ठ कागदपत्रे व रेकॉर्ड कसे ठेवावे यावर आधारित सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
शिक्षण परिषद केंद्रप्रमुख जयंत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शिष्यवृत्ती मार्गदर्शन प्रतीक्षा खेडेकर व सीमा कुमटकर यांनी इंग्रजी, बुद्धिमत्ता, मराठी या विषयातील उदाहरणांचे दाखले, क्लृप्त्या, व्याकरणातील बारकावे, विद्यार्थ्यांना कठीणातून सोपे कसे शिकवता येईल, रंजकता कशी निर्माण होईल, सराव कसा घ्यावा आदी गोष्टी स्पष्टीकरणाने प्रात्यक्षिकरित्या समजावून दिल्या. केंद्रप्रमुख जयंत शिंदे यांनी प्रशासकीय कामाची उत्तमप्रकारे माहिती देऊन सर्वांनी आपली कामे वेळेत पूर्ण करून कार्यालयाला प्रशासकीय कामात सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. शिक्षण परिषदेसाठी केलेल्या उत्तम नियोजनाबद्दल उपस्थित सर्वांनी मुख्याध्यापिका श्वेता खातू यांना धन्यवाद दिले. या वेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा अर्चना किंजळकर, अंकिता चरकरी, नितीन थोराडे, रवींद्र गमरे आदी उपस्थित होते.