स्पर्धा परीक्षांमध्येही गुणवत्ता राखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्पर्धा परीक्षांमध्येही गुणवत्ता राखा
स्पर्धा परीक्षांमध्येही गुणवत्ता राखा

स्पर्धा परीक्षांमध्येही गुणवत्ता राखा

sakal_logo
By

78788
तळेरे ः महाडिक महाविद्यालयाच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रा. रुपेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. (छायाचित्र : एन. पावसकर)

स्पर्धा परीक्षांमध्येही गुणवत्ता राखा

प्रा. रुपेश पाटील ः तळेरे विद्यालयाचे पारितोषिक वितरण

तळेरे, ता. २८ : सिंधुदुर्ग जिल्हा शालेय गुणवत्तेच्या बाबतीत महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर आहे. हीच गुणवत्ता स्पर्धा परीक्षेतही दिसावी. त्यासाठी शालेय स्तरापासूनच तयारीला लागा व पालकांचे स्वप्न पूर्ण करा, असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी येथे केले.
तळेरे पंचक्रोशी शिक्षण मंडळ, मुंबई यांचे वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रा. पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धन्वंतरी डॉ. प्रकाश बावधनकर होते. व्यासपीठावर सरपंच हनुमंत तळेकर, उपसरपंच शैलेश सुर्वे, उद्योजक नामदेव बांदिवडेकर, संस्थेचे चेअरमन अरविंद महाडिक, शालेय समितीचे सदस्य प्रवीण वरुणकर, शरद वायंगणकर, संतोष तळेकर, संतोष जठार, दिलीप तळेकर, नीलेश सोरप, रमाकांत वरुणकर, स्वप्नील कल्याणकर, मिथिल उबे, प्राचार्य अविनाश मांजरेकर, ज्येष्ठ शिक्षक चंद्रकांत काटे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्था गीत आणि विद्यालयाच्या संकेतस्थळाचा अनावरण सोहळा झाला. डॉ. प्रकाश बावधनकर यांनी संस्थेचे गीत लिहिले असून अजित गोसावी यांनी संगीतबद्ध केले आहे. विद्यार्थ्यांनी हे गीत गायले आहे. मान्यवरांच्या हस्ते वर्षभरात शैक्षणिक, क्रिडा आणि विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ज्येष्ठ शिक्षक चंद्रकांत काटे यांनी परिचय केला. सहाय्यक शिक्षिका पी. एम. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. आशा कानकेकर यांनी आभार मानले.
--
इतर मान्यवरांची मनोगते
प्रा. पाटील म्हणाले की, कला व सांस्कृतिक क्षेत्रात येथील अनेक दिग्गजांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविले; मात्र स्पर्धा परीक्षेतील यश समाधानकारक नसल्याचीही खंत व्यक्त करीत त्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. डॉ. बावधनकर यांनी जीवन जगताना एक तरी कला आत्मसात करा. सातत्याने प्रयोगशील रहा, असे मार्गदर्शन केले.