गवत नेणारा ट्रक अचानक पेटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गवत नेणारा ट्रक अचानक पेटला
गवत नेणारा ट्रक अचानक पेटला

गवत नेणारा ट्रक अचानक पेटला

sakal_logo
By

rat२९२७.TXT

बातमी क्र. २७ (पान ३ साठी)

फोटो ओळी
- rat२८p१५.JPG-
७८८०३
रत्नागिरी ः ट्रकमधील गवताला लागलेली आग विझवताना अग्निशमन यंत्रणा.
----
गवत नेणारा ट्रकने घेतला पेट
रत्नागिरी, ता. २८ ः शहरातील एकता मार्ग येथे आज (ता. २८) सायंकाळी गवत घेऊन जाणाऱ्‍या ट्रकने अचानक पेट घेतला. या आगीत गवत जळून गेले असून ट्रकचेही नुकसान झाले आहे. रस्त्यावरील ओव्हरहेड तारेचा स्पर्श झाल्यामुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे.

शहरातील एकता मार्ग येथे सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गवत वाहून नेणाऱ्‍या एका ट्रकला आग लागली. एकता नगर येथे ते गवत उतरण्यासाठी आणलेले होते. उच्च दाब वाहिनीला गवताचा स्पर्श झाल्यामुळे ठिणगी उडाली आणि आग लागली. रस्त्याच्या जवळ घरे असल्यामुळे चालकाने प्रसंगावधान राखत त्या परिस्थितीत ट्रक सुरक्षित ठिकाणी मोठ्या रस्त्यावर आणून उभा केला. गवत पेटू लागल्यानंतर आजुबाजूच्या नागरिकांची तारांबळ उडाली. तातडीने अग्निशमन यंत्रणेलाही कळविण्यात आले. एमआयडीसीचा अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला. दोन बंबाच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. तोपर्यंत ट्रकमधील गवत अर्धे अधिक जळून गेले होते. ट्रकच्या हौद्याचे लाकडी साहित्य जळून नुकसान झाले आहे. काही भाग पत्र्याचा असल्याने ते शाबुत राहीले.आग वेळीच विझवण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.