आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसमध्ये सिंधुदुर्गच्या रासम यांचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसमध्ये सिंधुदुर्गच्या रासम यांचे यश
आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसमध्ये सिंधुदुर्गच्या रासम यांचे यश

आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसमध्ये सिंधुदुर्गच्या रासम यांचे यश

sakal_logo
By

swt३०७.jpg
७९१६२
राजापूरः जागतिक टेबल टेनिस मास्टर्स वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेमध्ये कांस्यपदक पटकाविलेले राजेश मुदम आणि अनिल रासम.

आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसमध्ये
सिंधुदुर्गच्या रासम यांचे यश
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ३०ः ओमान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील टेबल टेनिस मास्टर्स वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेमध्ये कणकवली हरकूळचे सुपूत्र अनिल रासम यांनी राजापूरचे सुपूत्र राजेश मुदम यांच्या साथीने दुहेरीमध्ये कास्य पदक पटकावित भारताचा तिरंगा फडकविला.
जागतिक स्तरावर क्रिकेट, टेनिस या खेळांना ग्लॅमर प्राप्त झालेले असताना वेगवान खेळ म्हणून ओळखल्या जात असलेल्या टेबल टेनिस हा खेळ काहीसा दुर्लक्षित राहीलेला आहे; मात्र या खेळामध्ये कोकणातील या जोडीने सुमारे साठ देशांमधील २८०० स्पर्धक खेळाडूंचा सहभाग असलेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये मिळविलेले यश निश्‍चितच कौतुकास्पद आहे.
सत्तर विविध देशांमधील सुमारे पाच हजार खेळाडूंचा सहभाग असलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस मास्टर्स चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सहभागी होत त्यांनी लक्षवेधी कामगिरी केली आहे. हीच यशस्वी घौडदौड त्यांनी या नव्या वर्षामध्ये ओमान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस मास्टर्स चॅम्पियनशीप स्पर्धेमध्ये (६० वर्ष वयोगट) कायम ठेवली आहे. या स्पर्धेमध्ये जगभारातील साठ देशांमधील सुमारे २८०० खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये यश मिळविण्यासाठी त्यांनी टेबल टेनिसमध्ये वेगाने होत असलेल्या बदल डोळ्यासमोर ठेवून नियमित सराव करताना चालणे, अचुकता, लक्ष केंद्रीत करणे, धावणे, वजनावर नियंत्रण ठेवण्यावर प्रामुख्याने भर दिला. खो-खो, लंगडी, जिमनॅस्टीक, अ‍ॅथलेटीक्स या खेळांमधील अंगभूत असलेले कौशल्याचीही त्यांना साथ मिळाली. त्याच्या जोरावर शारीरीक आणि मानसिकतेची कसोटी लावणार्‍या टेबल टेनिस खेळामध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस मास्टर्स चॅम्पियनशीप स्पर्धेमध्ये दोघांनी कास्य पदकावर नाव कोरले. वर्ल्ड मास्टर्स टेबल टेनिस स्पर्धेमध्ये मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.