''सिमकार्ड ब्लॉक''च्या नावाखाली लूट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''सिमकार्ड ब्लॉक''च्या नावाखाली लूट
''सिमकार्ड ब्लॉक''च्या नावाखाली लूट

''सिमकार्ड ब्लॉक''च्या नावाखाली लूट

sakal_logo
By

swt308.jpg
79171
सावंतवाडी : येथे काहींच्या मोबाईलवर आलेली नोटीस.

‘सिमकार्ड ब्लॉक’ची फसवी नोटीस
सुनील भोगटेः सायबर क्राईमकडून तपास व्हावा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३०ः आपले सिमकार्ड ब्लॉक आऊट होणार, अशा प्रकारची नोटीस बीएसएनएलच्या नावाने मोबाईलवर पाठवून ओटीपीच्या साहाय्याने ग्राहकांना लुबाडण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. सावंतवाडीत अशा नोटिसा काही जणांना आल्या असून जिल्हा पोलिस यंत्रणेने सायबर क्राईमच्या माध्यमातून असे प्रयत्न हाणून पाडावेत, अशी मागणी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी केली आहे.
शहरात काही जणांच्या मोबाईलवर बीएसएनएलचा लोगो आणि तसेच राजमुद्रा चिन्ह असलेली इंग्रजीतील नोटीस आली आहे. त्यामध्ये तुमच्या सिम कार्डची व्हॅलेडीटी संपणार असून सिम कार्ड ब्लॅक आऊट होणार आहे. आपण २४ तासांत आम्हाला कॉल करा, असे इंग्रजीत म्हटले आहे. त्यामुळे काहींना या संदर्भात संशय आला असून ओटीपीच्या माध्यमातून एक प्रकारे लुबाडण्याचा प्रकार असल्याने त्यांनी दुर्लक्ष केले आहे; परंतु याबाबतची माहिती सर्वसामान्यापर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याने त्यामागील टोळीचा जिल्हा पोलिस यंत्रणेने छडा लावून हे प्रकार हाणून पाडावेत, अशी मागणी भोगटे यांनी केली आहे. यापूर्वी महावितरणच्या नावाने मोबाईलवर मेसेज पाठवून लुबाडण्याचे प्रकार समोर आले होते. सावंतवाडीतील काही जणांना याचा आर्थिक फटकाही बसला आहे. आता नवीन शक्कल लढवून बीएसएनएलच्या नावे फसवणूक करण्याचा या महाठगांचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले. असे संदेश किंवा नोटीस कोणाला आल्यास त्यांनी घाबरून न जाता संबंधित विभागाला कल्पना द्यावी व खात्री करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.