चिपळूण स्पिरीट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण स्पिरीट
चिपळूण स्पिरीट

चिपळूण स्पिरीट

sakal_logo
By

rat३०६.txt

बातमी क्र.. ६ ( टुडे पान १ )

ratchl३०३.jpg ः KOP२३L७९२३२ महापुराच्या पाण्यात चिपळूण शहर असे हरवले होते.

ratchl३०४.jpg ः KOP२३L७९२३३ चिपळूण ः पुरानंतर चिपळूण पूर्वपदावर आले आहे.

rat३०p२६.jpg ःKOP२३L७९२१७ चिपळूण ः महापुरात ज्यांची घरे वाहून गेली त्यांच्यासाठी अशी पक्की घरे बांधून देण्यात आली आहेत. एका अर्थाने चिपळूण स्पिरीटचे ते प्रतीक आहे.
....................................

महापुरानंतर सावरणारे
‘चिपळूण स्पिरीट’

इंट्रो

चिपळूणमधील महापुराच्या घटनेला आता दीड वर्ष लोटले. पुराची कारणे आणि उपाय यावर अद्यापही चर्चा, वाद सुरू आहेत. गाळ उपसा झाला; पण त्यालाही विविध आयाम आणि म्हणून मतमतांतरे आहेत. चिपळूण बचाव समितीच्या आंदोलनातून चिपळूणकरांची एकजूट दिसली. पुराच्या खुणा शहरातच नव्हे तर अंगाखांद्यावर बाळगत अल्पावधीत चिपळूण सावरले. मागील दीड वर्षात चिपळूणमधील जनजीवन कमालीच्या वेगाने पूर्ववत झालेले दिसते. याचे श्रेय तत्परतेने झालेल्या मदतकार्याला देता येईल. तितकेच हार न मानता परिस्थितीशी दोन हात करण्याच्या चिपळूणकरांच्या चिवट वृत्तीलाही द्यावे लागेल. याला ‘चिपळूण स्पिरीट’ असे आवर्जून म्हणता येईल. चिपळूण इतक्या अल्पावधीत महापुरातून कसे सावरले या विषयी चिपळूणकरांच्या मनाचा आणि विचारांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न ''सकाळ''ने केला. चिपळूण स्पिरीट म्हणजे काय याचा पडताळा पूरग्रस्तांच्या शब्दात मांडला आहे. ''सकाळ''च्या चिपळूण विभागीय कार्यालय वर्धापनदिनाच्या निमित्ताने हा स्पेशल रिपोर्ट.
- मुझफ्फर खान


चिपळूण, ता. ३० ः परशुरामभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकणाला निसर्गाचे वरदान लाभले आहे; पण या निसर्गाचा जेव्हा प्रकोप होतो. तेव्हा मात्र हे वरदानच शाप ठरते. जुलै २०२१ मध्ये म्हणजे साधारण दीड वर्षांपूर्वी कोकणसहित महाराष्ट्रातील अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली. चिपळूणची ओळख असलेल्या वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. परिणामी, चिपळूण शहराला आणि त्याच्या आसपासच्या परिसरालाही महापुराचा मोठा फटका बसला. भरतीची वेळ, संततधार आणि मुसळधार पाऊस, जोडीला कोयना धरणाचे दरवाजेही उघडले गेले. मध्यरात्रीतच सगळा परिसर जलमय झाला. लोकांच्या घरांमध्ये, दुकानांमध्ये पाणी शिरून स्थावर मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. इमारतीचे मजले पाण्याखाली दिसेनासे झाले. रस्त्यांवरील वाहने जलप्रवाहात कागदाच्या बोटीसारखी वाहून गेली. आजुबाजूच्या छोट्या गावांतील मातीची अनेक घरे उद्ध्वस्त झाली. जीवितहानी टळली ही त्यातल्या त्यात सुदैवाची बाब. संपर्काच्या सर्व यंत्रणा खंडित होत्या. वीजपुरवठा बंद. सर्वदूर नुसता काळोख. पूर ओसरल्यानंतरही रस्त्यांवर, लोकांच्या घरांमध्ये, गाळ्यांमध्ये होतं ते फक्त चिखल-गाळाचे साम्राज्य; मात्र अल्पावधीत महापुरातून चिपळूण उभे राहिले.

कोट
आपला संसार, सर्वस्व गाळाने गिळंकृत करताना चिपळूणकर पाहात होते; पण ते हतबल होते. अशा संकटस्थितीतही लोक एकमेकांना सावरण्यासाठी पुढे सरसावले होते. स्वत:च्या नुकसानीचं रडगाणे न गाता प्रत्येकजण मदतकार्यात हिरीरिने सहभागी झाला. महापुरानंतरच्या परिस्थितीचे प्रसारमाध्यमांवरील वार्तांकन पाहून राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून मदतीचा ओघ चिपळूणकडे प्रवाही झाला. या मदतीचे वाटप करण्यासाठी येथील यंत्रणांनी सक्रिय पुढाकार घेतला. जात, धर्म, पंत या पलीकडे जाऊन नागरिक म्हणून जो तो एकमेकांच्या मदतीला धावताना दिसत होता.
- ओंकार मोरे, व्यावसायिक - चिपळूण
फोटो - rat३०p२७.jpg--KOP२३L७९२१८
..........................

कोट
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आणि जनकल्याण समितीने मदतकार्यात मोठे योगदान दिले. आपत्तीग्रस्तांसाठी वितरणाची शिस्तबद्ध व्यवस्था संघकार्यालयात करण्यात आली होती. त्यामध्ये स्थानिक आणि बाहेरून आलेले स्वयंसेवक, महिला कार्यकर्त्या उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. पाग भागात विश्व हिंदू परिषद, रा. स्व. संघ, जनकल्याण समिती यांनी एकत्र येऊन मदतकार्य सुरू केले. मदतीचा ओघ इतका होता की, शेवटी जागा कमी पडायला लागली. त्यामुळे पुढील मदतकार्याची व्यवस्था गद्रे इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये करण्यात आली.
- उदय चितळे, व्यापारी - चिपळूण
फोटो - rat३०p२८.jpg--KOP२३L७९२१९

कोट
केशव आप्पाजी ओक ही चिपळूणच्या बाजारपेठेतील किराणामालाची मोठी आणि जुनी पेढी. तीन मजल्यांची ही इमारत. इमारतीचा तळमजला आणि पहिला मजला पुरात पूर्णत: जलमय झाला. वरच्या मजल्यावर सामान हलवण्याइतका अवधीही मिळाला नाही. अन्नधान्याची, सर्व जीवनावश्यक सामग्रीची नासाडी झाली. हे सर्व डोळ्यांदेखत होत असताना आम्ही कुटुंबातील सर्व मंडळींनी मात्र इमारतीच्या गच्चीवर जाऊन आजुबाजूच्या घरात अडकलेल्यांना, लहान मुलांना वाचवून टेरेसवर आणले. दुकानात जे काही खाण्याचे सामान शिल्लक होते ते सर्वांसाठी खायला उपलब्ध करून दिले. पूर ओसरला तेव्हा या पेढीतील लोक मदतकार्यातही सहभागी झाले. मुंबई-नवी मुंबईसारख्या विविध भागांतून लोकांनी मदत पाठवली होती. त्याची व्यवस्था करण्यात आम्ही पुढाकार घेतला. आजही भिती कायम आहे. पूररेषेमुळे ठप्प झालेला बांधकाम व्यवसाय पुन्हा सुरू होणे गरजेचे आहे.
- मंदार ओक, व्यापारी - चिपळूण
फोटो - rat३०p२९.jpg

कोट
खरंतर, चिपळूणला पूरस्थिती तशी नवीन नाही. यापूर्वीही अनेकदा वशिष्ठी नदीला पूर येऊन येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या आधी २००५ मध्ये वाशिष्ठीला आणि शिवनदीला पूर आला होता. त्या वेळी सर्वच घटकांचे मोठे नुकसान झाले. ती परिस्थिती लक्षात घेऊन अनेकांनी त्यांच्या व्यवसायांमध्ये, वास्तूरचनांमध्ये नुकसान टाळण्याच्यादृष्टीने बदलही केले होते; पण, २०२१चा महापूर हा चिपळूणमध्ये यापूर्वी आलेल्या कोणत्याही महापुराच्या तुलनेत अधिक प्रलयकारक होता. संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली गेली होती. पण स्वत:ला सावरता सावरताच ही व्यापारी मंडळी शेजारच्यालाही मदतीचा हात देत होती. त्यामुळे अल्प कालावधीत चिपळूण उभे राहिले.
- जफर कटमाले, चिपळूण
फोटो rat३०p३०.jpg--KOP२३L७९२२०

कोट
महापुरानंतरचे चित्र बघून नव्या पिढीतील अनेकांना यापुढे इथे राहणे धोक्याचे वाटू लागले. जसजसा काळ जाऊ लागला तसतसं हे सगळं सावरले आहे. चिपळूण बचाव समितीच्या पाठपुराव्यामुळे शासन, नाम फाउंडेशनच्या माध्यमातून वशिष्ठी आणि शिवनदीतील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. येथील नद्यांविषयीच्या आणि अन्य पर्यावरणीय समस्या जर योग्यप्रकारे उपाययोजना केली तर भविष्यात चिपळूणकरांना कदाचित अशा आपत्तींचा सामना करावा लागणार नाही. त्यासाठी चिपळूणकरांचा लढा सुरू आहे.
rat३०p३१.jpg--KOP२३L७९२२१
- समीर जानवलकर, समन्वयक नाम फाउंडेशन


कोट
मोठ्या उद्योगांप्रमाणेच छोट्या दुकानदारांचेही नुकसान झाले होते. अनपेक्षितपणे आलेल्या या पुरातून सावरण्यासाठी आम्ही जोडलेले व्यापारी संबंध उपयोगी पडले. ज्या व्यापार्‍यांकडून आम्ही माल घेतो त्यांनी मागच्या देण्यासाठी तगादा लावण्याऐवजी नव्याने उभे राहण्यासाठी माल देण्याची तयारी दाखवली. त्यामुळे उभे राहता आले. चिपळूणमधील तरुण मंडळीही मदतकार्यात आघाडीवर होती. चिपळूणच्या बाहेरूनही तरुणांचे गटही मदतकार्यासाठी आले होते. लोकांना रेस्क्यू करणे, गाई-गुरांना वाचवणे, घरोघरी मदत पोहोचवणे, औषधे पोहोचवणे, सफाई अशा कामात आम्हाला शहराबाहेरील लोकांची चांगली मदत मिळाली. व्यापाऱ्यांसाठी शासनाने-प्रशासनाने तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी व्यापारी महासंघाने केली होती. मात्र, तशी काही मदत मिळू शकली नाही; पण चिपळूणचा प्रत्येक व्यापारी स्वत:च्या पायावर उभा राहिला आणि तीन महिन्यांतच तो या संकटातून बाहेर पडला
rat३०p३२.jpg--KOP२३L७९२२२
- संजय धामणस्कर, पान शॉप व्यावसायिक


कोट
बचावकार्य असो, लोकांपर्यंत खाद्यपदार्थ व जीवनावश्यक मदत पोहोचवणे असो किंवा गाळ-चिखल साफ करणं असो, वैद्यकीय सेवा पुरवणे असो, सर्वच जातीधर्माच्या संस्था, स्वयंसेवक आणि त्यांच्या जोडीने सहभागी झालेले स्थानिक कार्यकर्ते दिवसरात्र एक करून काम करत होते. महिला कार्यकर्त्याही यात कुठे मागे नव्हत्या. परस्परांमध्ये निर्माण झालेला आपुलकीचा बंध ही या संकटाची चांगली बाजू होती.
छाया पोटे, गृहिणी खेर्डी
फोटो - rat३०p३३.jpg--KOP२३L७९२२३

कोट
चिपळूण परिसरातील नदीलगतच्या गावांमध्ये अनेक ठिकाणी घरंच्या घरे, गुरांचे वाडे वाहून गेले होते. शासन-प्रशासनाकडून तुटपुंजी आर्थिक मदत मिळाली. जीवनावश्यक वस्तूंची मदत तर अनेक मार्गाने पोहोचत होती; पण, डोक्यावरचं छप्पर नसेल तर काय उपयोग? शंकरवाडी गावात कोल्हापूरच्या काडसिद्धेश्वर स्वामींच्या मठाद्वारे बाधितांसाठी ९ चिरांची घरे उभारण्यात आली. ४७ लाख रुपयाची मदत चिपळूणसाठी देण्यात आली.
- प. पु. अदृष्य काडसिद्धेश्वर स्वामी कोल्हापूर
फोटो - rat३०p३४.jpg-KOP23L79224