
निगुडे शाळा नं. 1 चे स्नेहसंमेलन उत्साहात
swt3018.jpg
79263
निगुडेः प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
निगुडे शाळा नं. १ चे
स्नेहसंमेलन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ३०ः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगुडे नं. १ शाळेमध्ये विविध सांस्कृतिक व गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात झाले. यावेळी विविध शैक्षणिक व क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर यांच्या हस्ते झाले. यावेळी उपसरपंच गौतम जाधव, माजी सरपंच समीर गावडे, जयराम गवंडे, माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, आपा गावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा नेहा पोखरे उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, उपसरपंच व शाळेतून सेवानिवृत्त शिक्षिका उज्ज्वला गावडे यांचा शाळेच्या वतीने मुख्याध्यापक नेमळेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपशिक्षक असनकर यांनी शाळेच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला. सर्वोत्कृष्ट विद्यार्थी, विविध केंद्र व तालुकास्तरीय स्पर्धेत उज्ज्वल यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. यावेळी शाळेतील मुलांनी विविध वेशभूषा, नृत्य, गीतगायन, दशावतार नाटक असे वेगवेगळे कलागुण दाखवून उपस्थितांची वाहवा मिळविली. सूत्रसंचालन पांडुरंग होंडे यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या उपशिक्षिका साक्षी कोलते, माजी विद्यार्थिनी ऐश्वर्या राणे, पालक रोहिणी गावडे आदींनी विशेष मेहनत घेतली.