गोवेरीमधे ग्रंथप्रदर्शनास वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोवेरीमधे ग्रंथप्रदर्शनास
वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
गोवेरीमधे ग्रंथप्रदर्शनास वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गोवेरीमधे ग्रंथप्रदर्शनास वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

sakal_logo
By

79484
गोवेरी : येथील ज्ञानदीप वाचनालय व ग्रंथसंग्रहालयामध्ये ग्रंथप्रदर्शनात सहभागी झालेले जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा नेरूर- गोवेरीचे विद्यार्थी.

गोवेरीमधे ग्रंथप्रदर्शनास
वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कुडाळ, ता. ३१ : गोवेरी येथील ज्ञानदीप वाचनालय व ग्रंथ संग्रहालयामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने आयोजित ग्रंथप्रदर्शनास वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गोवेरी येथील ज्ञानदीप वाचनालय व ग्रंथसंग्रहालयामध्ये नुकतेच ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन केले होते. याचे उद्‍घाटन ज्ञानदीप वाचनालय व ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष सतिश गावडे व गोवेरीच्या उपसरपंच सौ. स्वरा गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी वाचनालयाच्या कार्यकारी मंडळाचे संचालक तसेच नेरूर - गोवेरी येथील जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व महिला वाचक उपस्थित होते. यावेळी उपसरपंच सौ गावडे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करताना सांगितले की, वाचनामुळे आपल्या बुध्दीमध्ये वाढ होते .समाजामध्ये होत असलेल्या घडामोडीची माहीती मिळत असते .वाचनालयामध्ये उपलब्ध असणाऱ्या दैनिके, साप्ताहिके, मासिके यांच्या माध्यमातून नविन नवीन माहिती अवगत होते. वाचनालयामध्ये असणारे बाल वाड:मय, कथा कादंबरी स्पर्धा पुस्तके यामुळे अधिकाधिक ज्ञान प्राप्त होते. जास्तीत जास्त वाचकानी वाचनालयामध्ये येऊन आपल्याला आवडणाऱ्या पुस्तकाच्या वाचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. या ग्रंथप्रदर्शनामध्ये २०२२- २३ या आर्थिक वर्षात खरेदी केलेल्या पुस्तकाचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये कथासंग्रह, कादंबरी, कवितासंग्रह, बालवाड:मय, धार्मिक ग्रंथ, स्पर्धा परीक्षा पुस्तकांचा समावेश करण्यात आला होता. ग्रंथपाल धोंडी गावडे यांनी सूत्रसंचालन केले. वाचनालयाचे अध्यक्ष सतिश गावडे यांनी आभार मानले.