
अर्बन बँकेच्या सत्तेच्या चाव्या सहकार पॅनेलकडे
rat३१p१०.jpg KOP२३L७९५०३
-राजापूरःदिनानाथ कोळवणकर, प्रकाश कातकर, जयंत अभ्यंकर, शशिकांत सुतार, हनिफ काझी, संजय ओगले, राजेंद्र कुशे, विजय पाध्ये, विवेक गादीकर
राजापूर अर्बनच्या चाव्या सहकार पॅनेलकडेच
दहा जागांवर विजय ;परिवर्तन पॅनेलला फक्त चार जागा
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३१ ः सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बँक म्हणून ओळखल्या जात असलेल्या राजापूर अर्बन बँकेच्या चुरशीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये सत्ताधारी सहकार पॅनेलने पंधरापैकी दहा जागांवर विजय संपाददन करीत पुन्हा एकदा अर्बन बँकेच्या सत्तेच्या चाव्या स्वतःकडे राखल्या. परिवर्तन पॅनेलने चार जागांवर विजय मिळवित सत्ताधार्यांच्या वर्चस्वाला आव्हान दिले मात्र ते अपुरे ठरले. तर, एका जागेवर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे.
कोरोनासह अन्य विविध कारणांमुळे लांबणीवर पडलेल्या राजापूर अर्बन बँकेची पंचवार्षिक निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची काल (ता. ३०) मतमोजणी झाली. सत्ताधारी सहकार पॅनेल विरूद्ध परिवर्तन पॅनेल अशा सरळ झालेल्या लढतीमध्ये दिवसभर झालेल्या मतमोजणीमध्ये पंधरापैकी सहा जागांचा निकाल जाहीर झाला होता. त्यामध्ये सत्ताधारी सहकार पॅनेलले तीन तर, परिवर्तन पॅनेलने दोन जागांवर विजय मिळविला होता. मात्र, सर्वसाधारण राजापूर तालुक्यातील शाखांसाठी या प्रवर्गातील नऊ जागांचा निकाल सत्तेचे चित्र स्पष्ट करण्याच्यादृष्टीने महत्वपूर्ण ठरणार होते. त्यामुळे या जागांच्या निकालाची सार्यांना उत्सुकता लागून राहीली होती. दरम्यान, या जागांची मतमोजणी रात्री उशीरा पार पडली. त्यामध्ये सत्ताधारी सहकार पॅनेलने नऊपैकी सात जागांवर निर्णायकी विजय मिळवून सत्तेच्या चाव्या स्वतःकडे राखल्या. त्यामध्ये सहकार पॅनेलचे उमेदवार आणि विद्यमान चेअरमन जयंत अभ्यंकर, संचालक हनिफ काझी, संजय ओगले, अॅड. शशिकांत सुतार, राजेंद्र कुशे, विवेक गादीकर, विजय पाध्ये हे विजयी झाले. तर, परिवर्तन पॅनेलचे उमेदवार आणि माजी संचालक दिनानाथ कोळवणकर आणि प्रकाश कातकर हे विजयी झाले. सर्वसाधारण राजापूर तालुक्यातील शाखांसाठी झालेल्या निवडणूकीमध्ये परिवर्तन पॅनेलचे कातकर यांनी सर्वाधिक मते मिळविली. या निवडणुकीमध्ये सत्ताधारी सहकार पॅनेलने बाजी मारली असली तरी, परिवर्तन पॅनेलने चार जागा जिंकत सत्ताधारी सहकार पॅनेलच्या वर्चस्वाला काहीसा हादरा दिला.
-----
माजी संचालकांचे वर्चस्व
पंधरा जागंसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये विद्यमान आणि काही माजी संचालकांचे वर्चस्व राहिले आहे. त्यामध्ये विद्यमान चेअरमन जयंत अभ्यंकर, संचालक हनिफ काझी, संजय ओगले, अॅड. शशिकांत सुतार, राजेंद्र कुशे, विजय पाध्ये, प्रसाद मोहरकर, अनिल करंगुटकर, अनामिका जाधव, माजी संचालक दिनानाथ कोळवणकर, अल्ताफ संगमेश्वरी हे पुन्हा एकदा संचालक म्हणून निवडून आले आहेत. तर, प्रकाश कातकर, किशोर जाधव, विवेक गादीकर आणि प्रतिभा रेडीज हे पहिल्यांदाच संचालक म्हणून निवडून आले आहेत. तर, विद्यमान संचालक सुनिल जाधव, धनश्री मोरे यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.
चौकट २
निवडून आलले उमेदवार
सर्वसाधारण राजापूर तालुक्यातील शाखांसाठी ः जयंत अभ्यंकर, हनिफ काझी, संजय ओगले, अॅड. शशिकांत सुतार, प्रकाश कातकर, दिनानाथ कोळवणकर, राजेंद्र कुशे, विवेक गादीकर, विजय पाध्ये. तालुक्याबाहेरील शाखांसाठी मतदार ः अल्ताफ संगमेश्वरी
अनुसुचित जाती जमाती प्रतिनिधी ः किशोर जाधव. भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी ः प्रसाद मोहरकर. इतर मागास प्रतिनिधी मतदार संघ ः अनिल करंगुटकर. महिला प्रतिनिधी मतदार संघ ः अनामिका जाधव, प्रतिभा रेडीज.