
उद्या रत्नागिरीत अर्थसंकल्पावर व्याख्यान
अर्थतज्ज्ञ दीपक करंजिकरांचे उद्या
रत्नागिरीत अर्थसंकल्पावर व्याख्यान
रत्नागिरी, ता. ३१ : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामण बुधवारी (ता. १) अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता. २) रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या सभागृहात सायंकाळी ६ वाजता त्याबाबतचे विश्लेषण करणारे व्याख्यान आयोजित केले आहे. दीपक करंजीकर मार्गदर्शन करणार आहेत.
देशातील ''सेल्स'' आणि ''मार्केटिंग टीम्स'' चे नेतृत्व त्यांनी केले असून आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक बहुराष्ट्रीय प्रकल्पांचे यशस्वी व्यवस्थापनही केले आहे. अमेरिकेत वॉलस्ट्रीटच्या कार्यपद्धती, आर्थिक दहशदवाद, तेल आणि त्याचे राजकारण, अमेरिकन धोरणे, नाणेनिधी, जागतिक व्यापार संघटना यांचा सखोल अभ्यास असून त्याबाबत त्यांनी विस्तृत लिखाणही केले आहे. ''आजच्या विश्वाचे आर्त'' आणि ''घातसूत्र'' या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी साहित्यक्षेत्रातही ठसा उमटवला आहे.
अर्थसंकल्प सादर केल्यानंतर परिणामस्वरुप अनेक आर्थिक क्षेत्रांमध्ये, योजनांमध्ये सुक्ष्म बदल होत असतात. अनेक वेळा देशाच्या आर्थिक घडामोडींमध्ये मोठे बदलही संभवतात. ज्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेवरही होत असतो. हा अर्थसंकल्प प्रत्येकाने आंतर्बाह्य समजून घेणे आवश्यक असते. त्यातील बारकावे समजून घेणे आवश्यक असते. २ फेब्रुवारीला आयोजित केलेल्या बजेट २०२३ या व्याख्यानात या बाबी समजावून देण्यासाठी दीपक करंजिकर यांना बोलावण्यात आले आहे. या व्याख्यानाचा घ्यावा, असे आव्हान वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.