पाकीटमारांच्या प्रतापाचा प्रवाशांना मोठा फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाकीटमारांच्या प्रतापाचा 
प्रवाशांना मोठा फटका
पाकीटमारांच्या प्रतापाचा प्रवाशांना मोठा फटका

पाकीटमारांच्या प्रतापाचा प्रवाशांना मोठा फटका

sakal_logo
By

79572
पाकीटमारांनी टाकलेली पाकिटे.

पाकीटमारांच्या प्रतापाचा
प्रवाशांना मोठा फटका

सावंतवाडीतील प्रकार; कारवाईची मागणी

सावंतवाडी, ता. ३१ : शहरात बाजार तसेच वैद्यकीय उपचार व अन्य काही शासकीय कामांसाठी ग्रामीण भागातून एसटीने येणाऱ्या गोरगरीब लोकांची पाकिटे मारण्याचे प्रकार सावंतवाडी बस स्थानकावर वाढले आहेत. पैसे काढून रिकामी पाकिटे परिसरात तशीच फेकून दिली जातात. याचे ढीग लागले आहेत. यात पैशांच्या नुकसानीबरोबरच एटीएम, आधार, पॅन कार्ड सारखी महत्त्वाची कागदपत्रेही गहाळ होत असल्याने नागरिकांना मनस्ताप होत आहे. त्यामुळे अशा भुरट्या पाकीटमारांचा बंदोबस्त करा, अशी मागणी सामाजिक बांधिलकी संघटनेने सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्याकडे केली.
यावेळी त्यांनी बस स्टॅन्डलगत असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या आवारातून गोळा केलेली काही महत्त्वाची कागदपत्रे असलेली पाकिटे पोलिसांच्या स्वाधीन केली. शहरात कामानिमित्त गावातून ये जा करणाऱ्या नागरिकांची बस स्टँडवर चोरट्यांकडून पाकीटे मारली जातात व पाकिटातील पैसे काढून सदर पाकिटे बस स्थानिकानजीक असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कंपाउंडमध्ये टाकली जातात. याची माहिती सामाजिक बांधिलकीचे संजय पेडणेकर व रवी जाधव यांना मिळाली. त्यांनी तत्काळ त्या ठिकाणी भेट दिली असता पशुवैद्यकीय अधिकारी वरठी यांनी कंपाउंडमधून जमा केलेली पाकिटे सामाजिक बांधिलकीच्या स्वाधीन केली. त्यानंतर जाधव व पेडणेकर यांनी ज्या पाकिटांमध्ये पत्ता किंवा फोन नंबर होता अशा लोकांना संपर्क करून पाकिटे परत केली. त्यानंतर उर्वरीत पाकिटे सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते जाधव व पेडणेकर यांनी पोलीस निरीक्षक मेंगडे यांच्याकडे जमा करीत पाकीटमारांना पकडून त्यांच्यावर कारवाई करा तसेच त्या परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी केली. याबाबत ठोस पावले उचलली जातील, अशी ग्वाही यावेळी मेंगडे यांनी दिली.
--
कोट
सामाजिक बांधिलकी संघटनेने केलेल्या मागणीची दखल घेतली जाईल. पाकिटमारांच्या प्रतापाची दखल घेतली जाईल. यापुढे जातीने लक्ष देऊन पाकीटमारांचा बंदोबस्त करू.
- फुलचंद मेंगडे, पोलिस निरीक्षक, सावंतवाडी