सदर ः मानवी नातेसंबंध देवदेवतातही जपले जातात

सदर ः मानवी नातेसंबंध देवदेवतातही जपले जातात

rat०११२.txt

(टुडे पान ४ साठी)
(२६ जानेवारी पान दोन)

जनरिती- भाती लोगो

फोटो ओळी
-rat१p५.jpg ः
७९६९३
डॉं. विकास पाटील
-

कोकणात आपल्याला शिवमंदिरांची संख्या मोठी दिसते. ही सारी मंदिरे गावाच्या बाहेर दूर जंगलात वा सह्याद्रीच्या अवघड कड्यांवर असलेली दिसतात. भगवान शंकर हे स्मशानवासी आहेत. त्यामुळे त्यांचे वास्तव्य हे अशा निर्मनुष्य ठिकाणीच असल्याचे दिसते. भुते ही भगवान शंकराचे भक्तगण म्हणून ओळखले जातात. कोकणात त्यांना अदृश्य शक्ती, संहारक शक्ती म्हणून ओळखले जाते. त्यातूनच चाळा ही संकल्पना रूढ झाली असावी. ही चाळा संकल्पना पर्यटनदृष्ट्या विकसित झालेल्या मंदिरांमध्ये फारशी आढळत नाही. यामध्ये कुणकेश्वर, मार्लेश्वर, वाडेश्वर, वेळणेश्वर, रामेश्वर अशी काही मोजकी शिवमंदिरेच पर्यटनस्थळे म्हणून नावारूपास आली आहेत.
--

- डॉं. विकास पाटील, पाचल
--

मानवी नातेसंबंध देवदेवतातही जपले जातात

कोकणातील या साऱ्याच शिवमंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात होतो. काही ठिकाणी हा उत्सव पाच दिवस चालतो. महाशिवरात्रीबरोबरच श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी येथे मोठ्या यात्रा भरतात. या उत्सवाबरोबरच मार्लेश्वराचा लग्नसोहळा विशेष चर्चिला जातो. इतर शिवमंदिरात आढळणारी गुराखी आणि त्याच्या गाईचा पान्हा सोडणे, पान्हा सोडलेल्या ठिकाणी शिवपिंडी असणे ही आख्यायिका मार्लेश्वराच्या बाबतीत सांगितली जात नाही तर त्या संदर्भात देवरूख येथे भगवान परशुरामांनी शंकराची स्थापना केली होती. पुढे शिलाहार काळात शिलाहार राजवटीस उतरती कळा लागली. दरोडे, खून, लुटालूट मोठ्या प्रमाणात सुरू झाली. हे सारे भगवान शंकरांना असह्य झाले. त्यांनी गाव सोडून सह्याद्रीच्या कडेकपारीत राहण्याचे ठरवले. ते रात्री बाहेर पडले. अंधारात पुढे जात असताना त्यांना एक झोपडी दिसली. त्या झोपडीत गेल्यावर तेथील व्यक्तीला त्यांनी जंगलात सह्याद्रीच्या कड्यावर आपणास पोहोचवण्याची विनंती केली. त्याप्रमाणे अंधारात त्या व्यक्तीने भगवान शंकरांना जंगलात सह्याद्रीच्या कड्यावरती पोहोचवले. दुसऱ्या दिवशी मंदिरातील पुजाऱ्याला देव गायब झाल्याचे दिसले. देव निघून गेला ही बातमी गावभर पसरल्यावर गावकऱ्यांनी देवाची शोधाशोध मोठ्या प्रमाणात केली. त्यांना त्यात यश आले नाही. पुढे अठराव्या शतकात अंगवलीचे सरदार आणेराव साळुंखे शिकारीस गेले असता शिकार त्यांना दिसून पळत होती. तिचा पाठलाग करता करता आणेराव या गुहेपर्यंत पोहोचले. ती शिकार गुहेत गेली आणि गुहेच्या तोंडावरती एक मोठा दगड पडला. सरदारांनी तो दगड बाजूला केला. मग त्यांना मारलेश्वराचे दर्शन झाले. तो दिवस मकर संक्रातीचा होता. म्हणूनच मकर संक्रातीला येथे खूप मोठी यात्रा भरते. त्याचवेळी साखरप्याची गिरिजादेवी व मार्लेश्वराचा विवाहसोहळा संपन्न होतो. हा विवाहसोहळा तीन दिवस चालतो. हा विवाहसोहळा लिंगायत पद्धतीने संपन्न होतो. यामध्ये साऱ्या जनरिती पार पाडल्या जातात. मुलगा पाहणे, मुलगी पाहणे, हळद लावणे, साखरपुडा असे विविध विधी पार पाडले जातात. मुलीकडील वऱ्हाडाची व्यवस्था ही शाही पद्धतीने ठेवली जाते. या साऱ्या विवाहसोहळ्यातून तत्कालीन परंपरांचे जतन होताना दिसते. ३६० मानकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होतो. मानवी मनातील या विवाह सोहळ्याचे देवी देवतांवर झालेले हे आरोपण सुखदायक वाटते. मार्लेश्वराचे हे असे वेगळेपण नजरेत भरणारे आहे. मार्लेश्वराच्या गुहेत आजही विजेचे दिवे लावता येत नाहीत. खारेपाटणच्या केदारेश्वर मंदिरातही विजेचे दिवे लावण्याचा प्रयत्न केल्यावर त्यामध्ये गावकऱ्यांना अपयश आले. म्हणजेच विज्ञानकाळातही तेथील प्राचीनत्व टिकून आहे. कुणकेश्वरलाही महाशिवरात्रीला परिसरातील आसरोडेचा लिंगेश्वर, कणकवलीचे गांगो ग्रामदैवत, मुणग्याची देवी भगवती, मसुरेगावचा भातेश्वर, जामसंडेची दिरबादेवी, नांदोसहून गिरोबा, आचऱ्याचा रामेश्वर, चिंदरची मतमाऊली, ओटवणे गावची भैरी देवी, कामतेची भगवती यासारख्या देवतांच्या पालख्या कुणकेश्वरांच्या भेटीस येतात. आचऱ्याचा रामेश्वर जामसंडेच्या दिर्बादेवीचा भाऊ मानला जातो. दिर्बा देवीला भावाकडून साडीचोळी पाठवली जाते तर दिर्बादेवीकडून रामेश्वरासाठीही धोतरजोडी जाते. साळशी येथील देव सिद्धेश्वर आणि देवी पावणाई या देवस्थानाच्या अखत्यारित ८४ खेडी येतात व त्या खेड्यातील देवताही यांच्या अधिपत्याखाली येतात. मानवी नातेसंबंध असे देवदेवतांतही जपले जातात. कोकणातील शिवमंदिरात अशा जनरिती भाती रूजल्या आहेत. हे सारे उत्सव आणि त्यातली भक्तिमयता, पावित्र्य येथील माणूस जीवापाड जपताना दिसतो.

(लेखक महाविद्यालयाचे मराठीचे प्राध्यापक आहेत.)
--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com