
कळसुलीसाठी निधी दिल्यामुळे अजित पवारांचे मानले आभार
79987
मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांची कळसुली ग्रामपंचायत सदस्य कल्पेश सुद्रीक यांनी भेट घेतली.
कळसुलीसाठी निधी दिल्यामुळे
अजित पवारांचे मानले आभार
कणकवली : कळसुलीचे (ता.कणकवली) पंच सदस्य कल्पेश सुरेश सुद्रीक यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी त्यांनी गावच्या विकासासाठी निधी दिल्याबद्दल श्री.पवार यांचे आभार मानले. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असताना अजित पवार यांनी कळसुली गावासह जिल्ह्याच्या विविध विकासकामंसाठी निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीमधून झालेल्या कामांची माहिती कल्पेश सुद्रीक यांनी श्री.पवार यांना दिली. मुंबईतील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात श्री.सुद्रीक यांनी श्री.पवार यांनी भेट घेतली. श्री.सुद्रीक हे कै.सुरेश सुद्रीक चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव आहेत. तसेच सुशिक्षित बेरोजगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.