-''संगीत तुका म्हणे आता'' अभंग, वादकांनी रंगवले
rat०३२४. txt
(टुडे पान ३ साठी, अॅंकर)
संगीत राज्य नाट्य स्पर्धा---लोगो
फोटो ओळी
-rat३p२.jpg ः
८०१३५
रत्नागिरी ः राज्य नाट्यस्पर्धेत समर्थ थिएटर्स, शिवोली, गोवा या संस्थेने सादर केलेल्या तुका म्हणे आता या नाटकातील एक क्षण. (नरेश पांचाळ ः सकाळ छायाचित्रसेवा)
----
''संगीत तुका म्हणे आता'' अभंग, वादकांनी रंगवले
समर्थ थिएटर्स शिवोली ; दिग्दर्शन, अभिनयाची उणीव
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः तुका म्हणे आता हे नाटक प्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या लेखणीतून उतरलेले नाटक राज्य नाट्यस्पर्धेत गोवा-शिवोली येथील समर्थ थिएटर्सने सादर केले; मात्र दिग्दर्शन आणि नवोदितांचा अभिनय यामुळे या नाटकाचा भक्तीरस रसिकांपर्यंत पोचला नाही. या नाटकातील अभंगांना वादकांच्या मिळालेली उत्तम साथ हीच जमेची बाजू. भूमिका साकारताना कलाकारांचा सराव कमी पडला. या नाटकातून शुद्रांनी वेद वाचण्याचा अधिकार नाही, असे म्हणणाऱ्यांना ज्ञानेश्वर माऊलीने दिलेला वसा पुढे नेणाऱ्या तुकारामांनी अभंगातून जनसामान्यांना वैष्णवांच्या मांदियाळीत सामिल करून जगण्याची उमेद दिली; मात्र ही उमेद या नाटकातून कलाकरांना जागती करता आली नाही. एकूणच रसिकांनी अभंग, वादकांचे कौशल्य यामुळे निर्माण झालेल्या भक्तीरसाला दाद दिली.
-----
काय आहे नाटक?
संगीत तुका म्हणे आता या नाटकात तुकारामांचे अभंग इंद्रायणीने तारले. या परंपरागत श्रद्धेचा एक तर्कसंगत अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. लोकपरंपरेचे आणि तुकारामांच्या कवितेने अद्भूत सामर्थ्य दर्शवणारे हे नाटक आहे. वेदांचे वाचन शुद्रांनी करू नये असे म्हणाऱ्या त्या काळच्या कर्मट ब्राह्मणांचे म्हणणे मात्र विठ्ठलभक्त तुकारामांनी अभंगातून जनसामान्यांचे जीवन सावरले; मात्र वेदशास्त्रात पारंगत लोकांना अभंग, ओव्यांमधून होणार भक्तीचा प्रसार त्यांना पाहवत नव्हता. तुकारामचे अभंग संताजी तेली लिहायचा. ग्यानबा, आवली यांच्याकडून हे अभंग मुखोद्गत होत असतं. देहूमध्ये भक्तीचा मार्ग सांगणाऱ्या तुकारामांची भेट छत्रपती शिवाजी महाराज ही घेतात. हिरे, माणिक, मोती आणतात; पण ते देखील तुकाराम स्वीकारत नाहीत. पुढे विष्णूमय जग वैष्णवाचा धर्म या शिकवणीतून जनसामन्यांना दिलेला भक्तीचा मार्गात बम्बाजी शास्त्री आडवे येतात. शुद्रांनी वेदांचे आचरण करू नये असे सांगतात. पुढे न्याय करण्यासाठी वागोटीचे रामेश्वर शास्त्री येतात. सोबत त्यांची पत्नी जानकीही येते. बम्बाजीला पंढरपुरातील आषाढीला नंतर न्यायदानात येईन असे सांगतात. न्यायदानात अभंगातूनच वेदांचा अर्थ तुकाराम सांगतात. रामेश्वर शास्त्री न्यायदान करताना तुकारामांची गाथा गोदावरीच्या पाण्यात टाकण्याचा आदेश देतात. त्या वेळी तुकारामाची लढाई विठ्ठलाशी सुरू होते. १४ दिवस अन्नपाण्यावाचून राहतात. अखेर संताजी, जानकी पाण्यात टाकलेली गाथा परत घेऊन येतात. रामेश्वरशास्त्रींनी चुकीचा निर्णय दिल्याने खजिल होतात. रामेश्वर शास्त्री त्यांची पत्नी जानकी तुळशी माळ स्वीकारतात. तुकारामांना लीन होतात, अशी या नाटकातील कथा, अभंग आणि वादकांच्या कौशल्याला रसिकांनी दाद दिली.
--
पात्र परिचय
तुकाराम ः संदीप कवळेकर, संतूतेली ः सागर सोपटे, ग्यानबा ः रवी काशीनाथ, जिजाई ः समीक्षा पेडणेकर, बम्बाजी ः मधुकर नाईक, पिऱ्या रामोशी ः गौतम नाईक, शिवाजी ः तुषार गोवेकर, जानकी ः उत्कर्षा तोसकर, रामेश्वरशास्त्री ः अशोक गवंडी, रामनायकाचार्य ः देवराज शेट्ये, शिपाई ः तुषार साळगाकर, प्रज्योत पेडणेकर, वारकरी ः सोनिया गोवेकर, ऋतुजा नाईक, आशा कारेकर, वासुदेव चोडणकर, देवानंद ताम्हाणेकर, गणेश गोवेकर.
---
सूत्रधार आणि साह्य
दिग्दर्शक ः मधुकर नाईक, निर्मितीप्रमुख ः समर्थ गोवेकर, संगीत संयोजक ः ऑर्गन, उद्देश पेडणेकर, तबला ः देवेंद्र केळकर, पखवाज ः सिद्धेश गवंडी, मंजिरी ः समीर पेडणेकर. पार्श्वसंगीत ः लक्ष्मण गवंडी, प्रकाशयोजना ः प्रमोद मांद्रेकर, नेपथ्य ः सदानंद गोवेकर, वेशभूषा ः कविता गोवेकर, रंगभूषा ः नाना म्हामल.
--
आजचे नाटक.
नाटक ः संगीत हे बंध रेशमांचे. सादरकर्ते ः ओम कलासृष्टी फोंडा, गोवा. स्थळ ः स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह, मारूती मंदिर, रत्नागिरी. वेळ ः सायं. ७ वा.
-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.