खंडोबा स्वरुपात श्री गवळदेव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खंडोबा स्वरुपात श्री गवळदेव
खंडोबा स्वरुपात श्री गवळदेव

खंडोबा स्वरुपात श्री गवळदेव

sakal_logo
By

80256
खंडोबा स्वरुपात श्री गवळदेव
कुडाळ ः येथील श्री गवळदेवाचा २५ वा वर्धापन दिन सोहळा तसेच ऋग्वेद संहिता स्वाहाकार यागानिमित्त वर्धापन दिनाच्या तिसऱ्या दिवशी महेश राऊळ यांनी श्री गवळदेव महाराजांची जेजुरीच्या श्री. खंडोबा रुपात पूजा बांधली. (छायाचित्र ः अजय सावंत)
.................
‘शांतिनिकेतन’चे आज स्नेहसंमेलन
सावंतवाडी ः भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान संचलित शांतिनिकेतन इंग्लिश प्री-प्रायमरी व प्रायमरी स्कूल, शांतिनिकेतन इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘कलाबहार’ उद्या (ता. ५) सकाळी दहाला येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या ‘नवरंग’ कलामंचावर आयोजित केले आहे. या कार्यक्रमाचे उद्‍घाटन कोकण विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या हस्ते व प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विकास सावंत यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी प्रतिष्ठानचे सचिव व्ही. बी. नाईक, शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार सी. एल. नाईक, सदस्य अमोल सावंत, राणी पार्वतीदेवी हायस्कूलचे मुख्याध्यापक जगदीश धोंड आदींची प्रमुख उपस्थिती आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संचालक विक्रांत सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब नंदीहळ्ळी यांनी केले आहे.
---
मिसळ महोत्सव पुढे ढकलला
देवगड ः येथील देवगड जामसंडे शहरात आमदार नीतेश राणे यांच्या माध्यमातून रविवारी (ता. ५) आयोजित मिसळ महोत्सव पुढे ढकलण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची यात्रा असल्याने व त्यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यात्रेस व पक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमास हजर राहणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला. पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे आमदारांनी जाहीर केले.
--
उद्योगमंत्री सामंत आज जिल्ह्यात
सिंधुदुर्गनगरी ः उद्योगमंत्री उदय सामंत हे उद्या (ता. ४) सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम असा ः सकाळी सातला रत्नागिरी येथून मोटारीने आंगणेवाडी (ता. मालवण) येथे प्रयाण, सकाळी अकराला आंगणेवाडी येथे श्री भराडी देवी यात्रोत्सवास उपस्थिती व दर्शन, दुपारी बाराला आंगणेवाडी येथून पाली (जि. रत्नागिरी) येथे प्रयाण.
--
कणकवलीत आज परिसंवाद
कणकवली ः भारतीय लोकशाही समाज महासंघातर्फे विवेकपूर्ण मताधिकाराचा उपयोग हेच निवडकर्त्याचे (निर्वाचक) सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचे साधन आहे, या विषयावर परिसंवादाचे आयोजन उद्या (ता. ५) दुपारी तीनला येथील गोपुरी आश्रमाच्या सभागृहात करण्यात आले आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.