उत्सव मैत्रीचा, सोहळा गुरू-शिष्य मेळाव्याचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उत्सव मैत्रीचा, सोहळा गुरू-शिष्य मेळाव्याचा
उत्सव मैत्रीचा, सोहळा गुरू-शिष्य मेळाव्याचा

उत्सव मैत्रीचा, सोहळा गुरू-शिष्य मेळाव्याचा

sakal_logo
By

rat4p18.jpg
80366
चिपळूणः पेढे येथील आर. सी. काळे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मेळाव्यात सहभागी माजी विद्यार्थी.
---------------
उत्सव मैत्रीचा, सोहळा
गुरू-शिष्य मेळाव्याचा
चिपळूण, ता. ४ः भगवान परशुराम पंचक्रोशी शिक्षण मंडळ संचालित पेढे येथील आर. सी. काळे माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थी व शिक्षकमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. मला पुन्हा एकदा शाळेत जायचंय, धावत जाऊन रोजच्या बाकावर बसायचंय या ओढीने १८ वर्षांनी सर्व माजी विद्यार्थी पुन्हा एकत्र आले. मेळाव्याच्या निमित्ताने संघटित झालेले माजी विद्यार्थी पुन्हा एकदा आपल्या शाळेच्या आठवणींमध्ये हरवून गेले. आपल्या बाकावरच्या जुन्या मित्र-मैत्रिणींना भेटल्याचा आनंद प्रत्येकाच्या डोळ्यात दिसत होता.
मेळाव्याची सुरवात दीपप्रज्वलन व सरस्वती मातेच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. त्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रगीत आणि संपूर्ण शालेय परिपाठ घेऊन संपूर्ण शाळेचे संस्कार आजही आम्ही विसरलो नसल्याचे विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. विद्यार्थ्यांच्या विनंतीला मान देऊन सर्व आजी-माजी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या सोहळ्याला उपस्थित होते. शिक्षकांचे आगमन, यथोचित स्वागत आणि सत्कार करण्यात आला. माजी मुख्याध्यापिका केतकर, माजी मुख्याध्यापक नागणे, कदम, माजी पर्यवेक्षक पाटील, माजी मुख्याध्यापिका नामजोशी, माजी शिक्षिका तावडे, मुख्याध्यापक शिंदे आदी आवर्जून उपस्थित होते.
शिक्षकांनी भविष्यातील आपली कर्तव्ये आणि जबाबदारी या विषयीही जाणीव करून दिली. विद्यार्थी आणि सर्व शिक्षकांसाठीही हा भावूक क्षण होता. सर्व विद्यार्थ्यांनी आपली नवीन ओळख व परिचय दिला. सूत्रसंचालन सुमित बोरले, स्वप्नील गमरे व प्रतिभा शिंदे यांनी केले. अशाच मेळाव्याच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी भेटण्याचा संकल्प करून कार्यक्रमाची सांगता झाली. भावूक आठवणी सोबत घेऊन पुन्हा प्रत्येकाची पावले आपापल्या कर्तव्याच्या ठिकाणी वळाली.