रत्नागिरी ः तेलसाठ्यांसाठी खोल समुद्रात सर्व्हे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः तेलसाठ्यांसाठी खोल समुद्रात सर्व्हे
रत्नागिरी ः तेलसाठ्यांसाठी खोल समुद्रात सर्व्हे

रत्नागिरी ः तेलसाठ्यांसाठी खोल समुद्रात सर्व्हे

sakal_logo
By

rat४p३०.jpg-
80432
रत्नागिरी ः तेलसाठ्यांसाठी ओएनजीसीमार्फत खोल समुद्रात सर्व्हे होणाऱ्या परिसराचा नकाशा.

rat४p३१.jpg-
80433
सर्व्हेसाठीच्या जहाजाचे संग्रहित चित्र

०००००००

तेलसाठ्यांसाठी जयगड समुद्रात सर्व्हे

मोठे जहाज दाखल; ४० नॉटिकलमध्ये मच्छीमारांसाठी सावधानता

रत्नागिरी, ता. ४ ः जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्‍यापासून ४० नॉटिकल मैल आत ओएनजीसी कंपनीमार्फत तेलाचे साठे शोधण्यासाठी भूकंपीय सर्वेक्षण (सिझमिक सर्व्हे) करण्यात येत आहे. त्यासाठी मोठे जहाज फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत जयगड ते रायगड परिसरात फिरणार आहे. हा सर्व्हे सुरू असताना दुर्घटना टाळण्यासाठी मासेमारी करण्यासाठी जाताना सुरक्षितता बाळगावी किंवा जहाजाच्या परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन मत्स्य विभागाकडून केले आहे.
याबाबतचे पत्र जिल्ह्यातील सर्व मच्छीमार सोसायट्यांना पाठवण्यात आले आहे. हा सर्व्हे समुद्रात ज्या ठिकाणी होणार आहे, त्या ठिकाणाचा नकाशा अक्षांश व रेखांशची माहितीही मच्छीमारांना कळवण्यात आली आहे. ओएनजीसी कंपनीमार्फत समुद्रात फेब्रुवारी २०२३ अखेरपर्यंत तेल संशोधन करण्यात येत आहे. त्यासाठी भूकंप संशोधन जहाज जयगड ते रायगडपासून ४० नॉटिकल मैल परिसरात दाखल झाले आहे. हे सर्वेक्षण क्षेत्र किनाऱ्‍यापासून लांब असून, दाभोळपासून खोल समुद्रात ७५ किमी अंतरावर होणार आहे. जहाजावरील विविध यंत्रणांच्या माध्यमातून माहिती संकलित केली जाणार आहे. हे जहाज ४ ते ४.५ नॉट्स वेगाने २४ तास सतत समुद्रात चालवले जाणार आहे. त्या जहाजाच्या मागे ६ हजार मीटर लांबीच्या (६ किलोमीटर) १० केबल्स लावण्यात आल्या आहेत. स्ट्रीमर्सची खोली ६ मीटर आणि शेपटीच्या दिशेने ३० मीटरपर्यंत पाण्याखाली असेल. प्रत्येक ६ हजार मीटर लांबीच्या केबलच्या शेवटी फ्लॅशिंग लाइटसह एक टेल-बॉय असेल. ही बोट सतत चालवलण्यात येणार असून, ती लगेच वळवता येत नाही. अपघात टाळण्यासाठी मच्छीमारांनी नौका व जाळी भूकंपीय जहाज आणि बाहेरील उपकरणाच्या मार्गापासून दूर राहावे. या जहाजाबरोबर दुसरे एक छोटे जहाज (सॅन्को स्काय) आणि तीन सुरक्षा व्हेसल्स (मॅट युरेनस, एनाक्षी, सोहा) या परिसरात तैनात करण्यात येणार आहेत. सर्वेक्षण करत असताना परिसरामध्ये मासेमारी नौकांच्या हालचालींवर प्रत्येकी दोन समन्वयक आणि दुभाष्यांद्वारे २४ तास निरीक्षण केले जाणार आहे. हे सर्वेक्षण वेळेत पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन कंपनी प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मासेमारीसाठी जात असताना मच्छीमारांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. हा सर्व्हे जास्तीत जास्त लवकर पूर्ण करण्यात येणार आहे.
-------------
कोट
ओएनजीसी कंपनीकडून समुद्रात सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यासाठी जहाज दाखल होत आहे. सर्वेक्षण करत असताना मच्छीमारांनी काळजी घेणे गरजेचे आहे. या संदर्भात मच्छीमार सोसायटींना पत्र पाठवण्यात आले आहे.
- एन. व्ही. भादुले, सहायक मत्स्य आयुक्त