Sun, April 2, 2023

तिहेरी अपघातात पिंगुळीत दोघे गंभीर
तिहेरी अपघातात पिंगुळीत दोघे गंभीर
Published on : 4 February 2023, 3:50 am
80497
पिंगुळी ः अपघातग्रस्त मोटार.
तिहेरी अपघातात पिंगुळीत दोघे गंभीर
कुडाळ ः मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी-मोडका वड येथे झालेल्या तिहेरी वाहन अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात आज रात्री घडला. अपघात दाखल होण्याची प्रक्रिया पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत सुरू होती. गोवा येथून मोटार कणकवली येथे जात होते. या मोटारीत चार वर्षांच्या मुलासह चौघेजण होते. मोटार पिंगुळी-मोडकावड येथे आली असता कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या दोन दुचाकींची मोटारीला धडक बसली. या अपघातात दोन्ही दुचाकींवरील दोघे जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर मोटारीचा टायर फुटून नुकसान झाले; मात्र मोटारीतील कोणीही जखमी झाले नाही.