जामसंडे येथे आजपासून क्रीडा महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जामसंडे येथे आजपासून क्रीडा महोत्सव
जामसंडे येथे आजपासून क्रीडा महोत्सव

जामसंडे येथे आजपासून क्रीडा महोत्सव

sakal_logo
By

80698
जामसंडे ः येथे कबड्डी स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेली मैदाने. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)


जामसंडे येथे आजपासून क्रीडा महोत्सव

११ पर्यंत आयोजन; पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ५ ः जामसंडे येथील सन्मित्र मंडळातर्फे उद्यापासून (ता.६) जामसंडे येथे क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले आहे. याचे उद्‍घाटन उद्या सायंकाळी सहाला पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. शनिवारपर्यंत (ता.११) महोत्सव चालणार आहे.
महोत्सवामध्ये राज्यस्तरीय पुरुष (निमंत्रित खुलागट कबड्डी स्पर्धा), जिल्हास्तर पुरुष व महिला (निमंत्रित) खुलागट कबड्डी स्पर्धा तसेच जिल्हास्तर कुस्ती स्पर्धा ६ ते ८ या कालावधीत, जिल्हास्तर हॉलीबॉल स्पर्धा १० ला तर जिल्हास्तर कॅरम स्पर्धा ११ ला घेण्यात येतील. सर्व स्पर्धा दिवस-रात्र होणार आहेत. उद्या सायंकाळी पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. त्यावेळी आमदार नीतेश राणे, आमदार विजय तथा भाई गिरकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रसाद लाड, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार प्रमोद जठार आदी उपस्थित राहणार आहेत. राज्यस्तरीय स्पर्धेत १५ संघ सहभागी होणार आहेत. जिल्हास्तरीय पुरूष गटाच्या कबड्डी स्पर्धेत १६ संघ तर महिलांचे ८ संघ सहभागी होणार आहेत. कुस्ती स्पर्धेमध्ये सुमारे १२० स्पर्धक, कॅरम स्पर्धेमध्ये सुमारे ८० स्पर्धक तर हॉलबॉल स्पर्धेत १६ संघ सहभागी होणार आहेत. यासाठी जामसंडे येथील इंदिराबाई ठाकूर क्रीडा नगरीत चार मैदाने तयार करण्यात आली आहेत. मुख्य मंचाबरोबरच तीन्ही बाजूने प्रेक्षक बैठक व्यवस्था उभारण्यात आली आहे. तीन मैदानावर कबड्डी स्पर्धा होतील तर एका मैदानावर कुस्ती स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. यासाठीची तयारी पूर्ण झाली असून बाहेरील संघ स्पर्धेच्या ठिकाणी दाखल होत होते. स्पर्धेच्या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.