
सावंतवाडी येथे भरती मेळावा
80805
आचरा पोलिस
निरीक्षकपदी कोरे
आचरा ः येथील पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील यांची बदली झाल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांची आचरा ठाण्यात नियुक्ती केली. याआधी कोरे यांनी सावंतवाडी, कुडाळ या मोठ्या पोलिस ठाण्यांचा कार्यभार सांभाळला असून सध्या ते जिल्हा वाहतूक कक्षात कार्यरत होते.
--
सावंतवाडी येथे
भरती मेळावा
सावंतवाडी ः औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सावंतवाडीतर्फे सोमवारी (ता.१३) सकाळी नऊला भरती मेळावा आयोजित केला आहे. कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार हा मेळावा होणार आहे. शिकाऊ उमेदवारी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना व ज्या प्रशिक्षणार्थ्यांना अद्याप शिकाऊ उमेदवारी प्राप्त झालेली नाही, अशांसाठी या मेळाव्याचे आयोजन केले आहे.
--------------
पुळास येथे १९ ला
शिवजयंती उत्सव
सावंतवाडी ः पुळास (ता.कुडाळ) येथील शिवशक्ती मंडळातर्फे १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव साजरा होणार आहे. मंडळाच्या वतीने विसाव्या वर्षी जयंती साजरी होत आहे. या निमित्ताने सकाळी साडेआठला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, अकराला भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी पाचला महिलांसाठी खुली ‘खेळ पैठणीचा’ स्पर्धा होणार आहे. स्पर्धकांनी १८ फेब्रुवारीपर्यंत नावे गुरुनाथ करमळकर यांच्याकडे द्यावीत, असे आवाहन मंडळाने केले आहे.
-------------
हत्तींचा बंदोबस्त
करण्याची मागणी
दोडामार्ग ः दोडामार्ग तालुक्यात धुडगूस घालणाऱ्या हत्तींना पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्याची मागणी ‘बाळासाहेबांची शिवसेने’चे दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. १५ वर्षांपासून दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा हैदोस सुरू आहे. या हत्तींकडून सुपारी, केळी, नारळ, भातशेती आदींचे नुकसान मोठ्या प्रमाणात केले जात असून त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थ हवालदिल बनले आहेत. त्यामुळे या हत्तींना त्वरित पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
-----------------
आंगणेवाडीत आज
‘भटाची बायपास’
मालवण ः आंगणेवाडी भराडी देवी रंगमंचावर उद्या (ता. ७) रात्री साडेदहाला आंगणेवाडी नाट्यमंडळ, मुंबई यांचे दोन अंकी विनोदी नाटक ‘भटाची बायपास’ होणार आहे. या नाटकात प्रसाद आंगणे, प्रतिक आंगणे, दिनेश आंगणे, निशिकांत आंगणे, बागेश्री जोशीराव, ऋचिता शिर्के, हेमांगी सुर्वे, नरेंद्र आंगणे, मिलिंद आंगणे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आंगणेवाडी मंडळाने केले आहे.
--
सिंधुदुर्गनगरीत
क्रिकेट स्पर्धा
कणकवली ः येथील महावितरणच्या कणकवली विभागातील कर्मचारी आणि ठेकेदारांचे क्रिकटे सामने होणार आहेत. सिंधुदुर्गनगरीतील मैदानावर ११ फेंब्रुवारीला हे सामने आयोजित केले असून यात विभागातील आठ संघांचा सामावेश आहे. सामन्यातील विजेते, उपविजेते, मालिकाविर, सामानाविर, फलदांज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांना पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांसाठी एक तासाचा योगाभ्यास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.