सदर ः ऑनलाइनच्या आधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सदर ः ऑनलाइनच्या आधी
सदर ः ऑनलाइनच्या आधी

सदर ः ऑनलाइनच्या आधी

sakal_logo
By

rat०६११.txt

( टुडे पान ३ साठी, सदर)
(२४ जानेवारी टुडे तीन)

टेक्नोवर्ड ........लोगो

फोटो ोळी
-rat६p७.jpg ः
80775
संतोष गोणबरे
---

कोरोनाने सर्व जगाचा जगण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. तंत्रज्ञान कितीही सुधारलेलं असलं तरी ते जैविक विषाणूसमोर सुमारच भासले. कोरोनाने जे जे काही बदललं त्यात शिक्षणाचा वरचा क्रमांक लागतो. म्हणजे अंतथ्य शिक्षण दूरस्थ झाले. हा बदल एवढाच नव्हता तर शाळाविषयक समग्र दृष्टिकोन बदलण्याचे काम या महामारीने केले. तंत्रज्ञानाचा मुबलक वापर आणि हव्या त्या प्रमाणात माहितीचा साठा उपलब्ध करून देण्याचे अनेकविध मार्ग डिजिटल माध्यमातून सुरू झाले; पण त्याआधी अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणात करण्यात येत नव्हता, असे नाही. आपलं कसं ना... जे घाऊक उपलब्ध होतं ते आपण सहजी ओरपतो. मग जुनं कितीही स्वादिष्ट आणि पोषक असलं तरी त्याला नाकारून फक्त नव्या रूचकर चवीची लाळ आपण सांडत बसतो. शिक्षणातही असंच काहीसं घडतं आहे.

- संतोष गोणबरे, चिपळूण
--
ऑनलाइनच्या आधी...


शिक्षणात तंत्रज्ञान खूप पूर्वीच आले होते. विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी महत्वाचे पर्याय निवडून आपापले कौशल्य विकसित करण्यासाठी त्याचा वापर करून घेतला. सध्या पन्नाशीच्या पुढे असलेल्या पिढीला संगणकाची साधी तोंडओळखही नव्हती; पण आज तीच पिढी निर्विवाद टेक्नोसेव्ही झालेली आहे. कोणतेही डिजिटल उपकरण सफाईने वापरण्याचे कसब त्या जुन्या पिढीने आत्मसात केलेले आहे म्हणजे जेव्हा पहिल्यांदा विद्यार्थ्यांना संगणक शिकवण्याची वेळ आली तेव्हा पूर्वीच्या शिक्षकांनी तो आधी आपण समजून घेतला आणि मग नव्या पिढीच्या विद्यार्थ्यांना समजावून शिकवला. ओवरहेड प्रोजेक्टर नावाचे उपकरण अनेक वर्षे शाळेने वापरले. पहिला रोझल स्लाइड प्रोजेक्टर हा ११ मे १९६५ ला डेव्हिड हॅन्सेन नावाच्या व्यक्तीने पेटंट केला होता. आज आपण ओळखत असलेला डिजिटल प्रोजेक्टर जीन डॉल्गॉफ यांनी १९८४ मध्ये तयार केला. डीएलपी, एलसीडी, एलसीओएस, लेसर प्रोजेक्टर असे त्यांचे प्रकार पुढे बदलत गेले. शिक्षक छान अशा आकृत्या रंगीत पेनाने काढून मोठ्या पडद्यावर किंवा पांढऱ्या भिंतीवर प्रक्षेपित करून विद्यार्थ्यांना समजावून सांगत. विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देऊन त्यांनाही तशा प्रकारचा प्रकल्प राबवायला सांगत. आता जो ज्ञानरचनावाद शिक्षणाचा मुलभूत अंग बनला आहे; त्याची सुरवात २०व्या शतकाच्या पूर्वार्धात स्विस मानसशास्त्रज्ञ व शिक्षणशास्त्रज्ञ झां प्याजे व रशियन मानसशास्त्रज्ञ लेव्ह सेमेनोव्हिच व्योगोट्स्की यांच्या डोक्यात रूजण्याआधी प्रत्येक शाळेतील शिक्षक मुलांना खडे गोळा करून आणायला सांगायचे आणि गणित शिकवायचे. दगडाला दोरा बांधला की वर्तुळ, त्रिजा, परिघ आणि बरंच काही समजायचं. शेतात गेलं की, समांतर रेषा शिकायला मिळायच्या. नांगराला जुंपलेले दोन बैल समांतर चालूनही वळण घेतात हे निरीक्षण नोंदवले की, आकलन व्हायचे. पृथ्वीवर कोठेही समांतर हा सिद्धांतच अस्तित्वात नाही. सूर्यफूल पाहिले की, फिबोनसी सिक्वेन्स हा गुंतागुंतीचा घटक सहज आकलन व्हायचा. फळ्यावर आकृती रेखाटताना या नंतर हे, त्यानंतर ते अशी विभागणी आकृतीतील प्रत्येक भागाचे महत्व विषद करायची. एवढंच कशाला, जास्वंदीचे किंवा चाफ्याचे फूल पाय दुखेस्तोवर शोधून आणायचे आणि शाळेत जाऊन शिक्षकांच्या नजरेसमोर त्याचे विच्छेदन करायचे, याला आपण तंत्रज्ञानाचा सर्वोत्तम प्रयोग म्हणणार नाही का?
वैदिक विचारांनुसार विद्येचे ‘परा’ व ‘अपरा’ असे दोन प्रकार पडतात. परा म्हणजे आत्मसाक्षात्कारी विद्या तर अपरा म्हणजे ऐहिक अथवा लौकिक जीवनातील उपयुक्त ज्ञान. आज ऑनलाइनच्या जगात दिशाभूल करणाऱ्या माहितीचा प्रभाव जास्त जाणवत असताना पूर्वीच्या शिक्षणपद्धतीत भावनिक बुद्धिमत्तेचा कमकुवतपणा नष्ट करणाऱ्या आणि अमूर्त संकल्पना समजावून देणाऱ्या निसर्गाची उदाहरणे नजरेसमोर येतात तेव्हा जाणवतं की, तंत्रज्ञान म्हणजे फक्त यांत्रिक विकास नव्हे तर तो असतो नवी नवी तंत्रे वापरून घडवलेला बुद्धीचा विकास. खोटं वाटेल; पण पूर्वीच्या काळात कान पिळून किंवा पोटाला चिमटा घेऊन एखादी संकल्पना समजावून सांगितली जायची जी आयुष्य सरलं तरी कोणी विसरत नव्हता. आताच्या काळात सरकार निपुणसारखी प्रभावी शिक्षणयोजना राबवू पाहत असताना तंत्रज्ञानाच्या संदर्भात एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे नवीन तंत्रज्ञानाची उभारणी उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाच्या साहाय्यानेच होत असते. अश्मयुगातला माणूस आजच्या माणसाइतकाच बुद्धिमान होता आणि त्याने त्या वेळच्या गरजेनुसार शोध लावले. अश्मयुगातील दगडी हत्यार हा एक त्या वेळचा प्रचंड मोठा यांत्रिक शोध होता आणि आगीच्या किंवा गोल चाकाच्या शोधाने तर सगळ्या तांत्रिक करामतीच बदलल्या. १८व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रज, फ्रेंचसारख्या पाश्चिमात्य देशाचे समूह भारतात येऊ लागले. लॉर्ड मेकॉलेच्या धोरणानुसार शिक्षणात इंग्रजी भाषेचा उपयोग केला जाऊ लागला. कोरोनाने तर तीही भाषा बदलून टाकली. आता शून्य आणि एक म्हणजे मशीन कोड भाषा डिजिटल युगात प्रत्येक तंत्रज्ञानाची जननी झाली आहे. आपण ज्याला ऑनलाईन म्हणतो ती सर्व प्रणाली या मशीन कोडभाषेत कार्य करते, याचे सोपे उदाहरण म्हणजे मॉलमध्ये गेल्यावर स्कॅन कोडने बिलिंग बनवले जाते. त्या उभ्या रेषा ना आपल्याला कळत ना वस्तू विकणाऱ्या दुकानदाराला. त्या असतात शून्य आणि एकच्या रेषा. आपण शून्याकडून एककडे जातो आहोत की, एककडून शून्याकडे हे सातत्याने बदलणाऱ्या काळालाही माहीत नाही. आपण फक्त ‘ऑनलाईन आणि नवीन तंत्रज्ञान’ या परवलीच्या शब्दांत पुरते बुडालेलो आहोत. इतके की या शब्दांची नीटशी व्याख्याही आपण करू शकत नाही!

(लेखक महाविद्यालयाचे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आहेत.)
-