
क्रिकेट स्पर्धा
rat०६१४.txt
(टुडे पान २ साठी, संक्षिप्त)
फोटो ओळी
-rat६p५.jpg ः
८०७४८
गावतळे ः जिल्हाध्यक्ष प्रवीण काटकर व तालुकाध्यक्ष विजय फंड हे आपल्या संघाचे अभिनंदन करताना.
--
अखिल दापोली शिक्षक संघ विजेता
गावतळे ः शिक्षकमित्र प्रतिष्ठान सावर्डे यांच्यावतीने प्राथमिक शिक्षकांसाठी आयोजित रत्नागिरी जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत दापोलीच्या अखिल शिक्षक संघाने चषकावर नाव कोरले, तर उपविजेतेपद गुहागर फायटर्स संघाला मिळाले. अत्यंत चुरशीने झालेल्या सामन्यासाठी शेवटच्या षटकात २० धावांची गरज असतांना सलग तीन षटकार ठोकून अखिल संघाला विजय प्राप्त करून देणाऱ्या रवीराज हांगेना मॅन ऑफ मॅच, तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून भाऊसाहेब गोरे यांना गौरवण्यात आले. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून कर्णधार सुधाकर पुटवाड यांना सन्मानित करण्यात आले. जिल्हाध्यक्ष प्रवीण काटकर आणि दापोली तालुकाध्यक्ष विजय फंड यांनी आपल्या संघाचे अभिनंदन केले.
---
रत्नागिरीत जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा
साडवली ः राष्ट्रीय विज्ञानदिनाच्या औचित्याने (ता. २८ फेब्रुवारी) रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळातर्फे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा स्वातंत्र्यसैनिक (कै.) डी. जी. इनामदार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित करण्यात आली आहे. निबंध स्पर्धेसाठी ''पर्यावरण संरक्षणात माझी भूमिका'' हा विषय ठेवण्यात आला. ५वी ते ८वीमधील शिकणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी (प्राथमिक व माध्यमिक शाळा) सहभागी होऊ शकतात. निबंधाचे माध्यम मराठी किंवा इंग्रजी असेल. निबंधासाठी शब्दमर्यादा किमान ५०० शब्द असतील. निबंध स्वहस्ताक्षरात लिहिलेले असावेत, टंकलिखित नसावेत. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र दिले जाईल. स्पर्धेसाठी प्रवेशशुल्क नाही. निबंध पाठवण्याची अंतिम तारीख २० फेब्रुवारी संध्याकाळपर्यंत असेल. स्पर्धकांनी आपले निबंध पुढील पत्त्यावर पाठवावेत. सनगरे पी. टी. (कार्यवाह), रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ, मु. पो. ता. लांजा (वैभव वसाहत),स्वामी स्वरूपानंद नगर, लांजा, जि. रत्नागिरी. जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
---
चिपळुणातील तरुणांचा युवासेनेत प्रवेश
चिपळूण ः चिपळूण शहर शिवसेनेच्यावतीने तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व विविध संस्थांवर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन उद्धव ठाकरे गटाच्या शहर शिवसेनेच्यावतीने माऊली बॅक्वेट हॉलमध्ये करण्यात आले होते. या निमित्ताने शहरातील माजी नगरसेविका शाकिरा नूर सरगुरू यांचे नातू मोहम्मद अली सरगुरू यांच्यासोबत तालुक्यातील अनेक तरुणांनी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत युवासेनेत जाहीर प्रवेश केला. डिसेंबरमध्ये तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत विविध ग्रामपंचायतीत शिवसेना ठाकरे गटाचे सरपंच, उपसरपंच विराजमान झाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार करण्यात आला. त्याशिवाय चिपळूण अर्बन बँकेचे नवनिर्वाचित संचालक मंडळ तसेच चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या तालुकाध्यक्षपदी खेर्डीचे माजी सरपंच दशरथ दाभोळकर यांची निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. खासदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्या उपस्थितीत मनसे शहर कार्याध्यक्ष परेश साळवी, डीबीजे चे युनिट अध्यक्ष आदित्य पेडणेकर यांच्यासोबत अनेक तरुणांनी युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते, शहरप्रमुख पार्थ जागुष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेत जाहीर प्रवेश केला.
-----