देवरूख-संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवरूख-संक्षिप्त पट्टा
देवरूख-संक्षिप्त पट्टा

देवरूख-संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

rat०६२७.txt

(पान २ साठी, संक्षिप्त)

फोटो ओळी
-rat६p१६.jpg ः
८०८०९
देवरूख ः ः पालखी नृत्य स्पर्धेतील प्रथम विजेता करंबेळे येथील श्री देव गांगोबा पालखी नृत्य पथक संघ.
------------
श्री देव गांगोबा पालखी नृत्यपथक विजेते

देवरूख ः मुंबईतील घाटकोपर भटवाडी येथे झालेल्या पालखी नृत्य स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील नामांकित पाच संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे येथील श्री देव गांगोबा पालखी नृत्य पथक या संघाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
ही स्पर्धा मनसेचे सुनिल शिर्के यांनी आयोजित केली होती. स्पर्धेत जय श्रीमुख मठ बंडबेवाडी (ता. लांजा), श्री देव गांगोबा पालखी नृत्य पथक (करंबेळे, ता. संगमेश्वर), आई सुकाईदेवी पालखी नृत्य पथक (चिंचघरी, ता. चिपळूण), चंडिकादेवी पालखी नृत्य पथक मळण (ता. गुहागर) व वाघजाई देवी पालखी नृत्य पथक (तनाळी, ता. चिपळूण) या संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील श्री देव गांगोबा पालखी नृत्य पथक करंबेळे हा संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. या संघाने प्रथम देखावा सादर केला. त्यानंतर पालखी नृत्य सादर केले. या संघाला रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले तर या संघाला उत्कृष्ट ढोलवादनासाठी आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. ओंकार बारगुडे याला उत्कृष्ट निशाणसाठी आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले.
---
रायपाटणला अखंड हरिनाम यज्ञ

राजापूर ः तालुक्यातील श्री क्षेत्र रायपाटण येथे नुकताच अखंड हरिनाम यज्ञ सोहळा पार पडला. या निमित्ताने दररोज पहाटे श्री गुरूचरित्र पारायण, होमहवन, आरती, श्री ज्ञानेश्वरी पारायण, नवनाथ पारायण, हरिपाठ, कीर्तन असे विविध कार्यक्रम पार पडले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, मुंबई येथून अनेक दत्तभक्त भाविक या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कीर्तन व श्री दत्तपालखी सोहळ्याने या कार्यक्रमाची सांगता झाली. दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी बांबरकर दत्तमंदिर ट्रस्टमार्फत तालुक्यातील पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सुमारे १२०० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या परीक्षेच्या यशस्वीतेसाठी तालुक्यातील शिक्षकवृंदांनी मेहनत घेतली.

--