
अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे तळेबाजार येथे उद्घाटन
80827
तळेबाजार ः येथील क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संदीप तेली यांच्या हस्ते झाले. यावेळी गोविंद उर्फ पप्पू लाड, संतोष वरेरकर उपस्थित होते.
अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे
तळेबाजार येथे उद्घाटन
देवगड, ता. ६ ः तालुक्यातील तळेबाजार येथील रोहित म्हापसेकर मित्रमंडळाच्या वतीने (कै.) वैभव बांदिवडेकर यांच्या स्मरणार्थ ''वैभव चषक'' अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन तळेबाजार येथील महात्मा गांधी विद्यामंदिरच्या क्रीडा मैदानावर करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन माजी सरपंच तथा आंबा बागायतदार संदीप तेली यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी गणेश उत्साही मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, पावणाई सरपंच गोविंद लाड, गुरुनाथ बांदिवडेकर, तळेबाजार पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे खजिनदार संतोष वरेरकर, मुख्याध्यापक नंदन घोगळे, दत्तप्रसाद जोईल, मित्रमंडळ अध्यक्ष रोहित म्हापसेकर, मंगेश मांजरेकर, प्रथमेश माणगावकर, वैभव मल्हार, तळवडे ग्रामपंचायत सदस्य तिमिर माणगावकर, अमृत माणगावकर आदी उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्या संघाला २० हजार २३ रुपये, सहा फुटी चषक व चांदीची फ्रेम, तर उपविजेत्या संघाला १० हजार २३ रुपये, पाच फुटी चषक व चांदीची फ्रेम देण्यात येणार आहे. उर्वरित दोन संघांना अनुक्रमे ५ हजार २३ रुपये, चार फुटी चषक व चांदीची फ्रेम तसेच ३ हजार २३ रुपये, ३ फुटी चषक व चांदीची फ्रेम देण्यात येईल. स्पर्धेतील प्रत्येक सहभागी संघास एक चांदीची फ्रेम तसेच टी शर्ट देण्यात येणार आहे. मालिकावीराला चषक व सोन्याची अंगठी तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाजा यांना चषक देण्यात येणार आहेत.