
सावंतवाडीत 12 फेब्रुवारीला वैश्य समाज वधू-वर मेळावा
सावंतवाडीत १२ फेब्रुवारीला
वैश्य समाज वधू-वर मेळावा
सावंतवाडी, ता. ६ ः वैश्य समाज सावंतवाडी आणि वैश्यवाणी समाज कमिटी सिंधुदुर्ग यांच्या वतीने शतकमहोत्सवी सोहळ्यानिमित्त ३५ वा वधू वर परिचय मेळावा, वार्षिक स्नेहसंमेलन १२ ला सकाळी १० वाजता येथील वैश्य भवन हॉलमध्ये होत आहे. या वेळी वैश्य समाज बांधव शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांचा जिल्हा वैश्यवाणी समाज यांच्या वतीने सत्कार आयोजित केला आहे. उद्घाटन मंत्री केसरकर यांच्या हस्ते तर माजी आमदार राजन तेली यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे. प्रमुख उपस्थिती कोकण सिंचन महामंडळ माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्था चेअरमन दिलीप पारकर, कोकण रत्न उद्योजक शाळीग्राम खातू, अखिल गोमंतक वैश्य परिषद अध्यक्ष शुभ्राय दिनानाथ शेठ उर्फ सुभाष मसूरकर व वैश्यवाणी समाज बेळगाव अध्यक्ष दत्ता कतबर्गी उपस्थित राहणार आहेत. सकाळी ९.३० वाजता वैश्यवाणी समाज जिल्हाध्यक्ष सुनील भोगटे यांच्या हस्ते ध्वजवंदन, ९.३० ते १०.३० वाजता अल्पोपहार व वधू-वर नोंदणी, सकाळी १०.३० ते १.३० वाजता उद्घाटन व सत्कार, वधू-वर परिचय, दुपारी १.३० ते २.३० वाजता स्नेहभोजन, २.३० ते ५ वाजता वधू-वर, पालक परिचय व गाठीभेटी, ६ वाजता समारोप होईल. सोहळ्याचे ध्वजवंदन वैश्य समाज कमिटी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सुनील भोगटे यांच्या हस्ते होणार आहे.
या सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग वैश्य समाज अध्यक्ष सुनील भोगटे, सावंतवाडी वैश्य समाज अध्यक्ष रमेश बोंद्रे, स्वागताध्यक्ष अॅड. दिलीप नार्वेकर, वैश्य समाज सिंधुदुर्ग सचिव भार्गवराम धुरी, उपाध्यक्ष अॅड. पुष्पलता कोरगावकर, सेक्रेटरी शशिकांत नेवगी, खजिनदार गणेश बोर्डेकर, सदस्य दत्तप्रसाद मसुरकर, अशोक नाईक आदींनी केले आहे.