
धन्वंतरी धर्मादाय संस्थेचा रुग्णसेवेसाठी सत्कार
rat०७२१.txt
(टुडे पान २ साठी)
फोटो ओळी
-rat७p९.jpg-
रत्नागिरी : धन्वंतरी संस्थेच्या सदस्यांचा सत्कार करताना फुणगूस येथील श्री सिध्दीविनायक गणपती देवस्थान न्यास, वैद्यकीय मदतनिधी न्यासाचे पदाधिकारी.
------------
धन्वंतरी धर्मादाय संस्थेचा रुग्णसेवेसाठी सत्कार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : धन्वंतरी धर्मादाय संस्थेची स्थापना आरोग्य, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यासाठी गतवर्षी जानेवारीत करण्यात आली. संस्थेच्या कार्याबद्दल फुणगूस येथील श्री सिद्धीविनायक गणपती देवस्थान न्यास, वैद्यकीय मदतनिधी न्यासातर्फे (मुंबई) सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.
धर्मादाय आयुक्तांकडे अधिकृत नोंदणीसाठी अर्ज केला आहे. संस्था आरोग्य क्षेत्रात भरीव काम करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून संस्थेतील सदस्य हे सुमारे ७ ते ८ वर्ष रत्नागिरी येथे (अपरांत) जय परशुराम रुग्णोपयोगी साहित्यसेवा उपक्रम राबवतात. यामध्ये रुग्णाला अल्प सेवाशुल्क आकारुन फाऊलर बेड, एअर बेड, व्हील चेअर, कमोड चेअर, वॉकर्स, नेब्युलायझर, ऑक्सीजन कॉन्सट्रेटर, शवपेटी अशा प्रकारच्या अत्यावश्यक सेवा देत आहेत.
संस्थेमार्फत ग्रामीण भागामध्ये नेत्र, आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन, जिल्हा रुग्णालय, लायन्स हॉस्पिटल यांच्या सहकार्याने आयोजन केले जाते. संस्थेचे सदस्य समीर करमरकर हे नेत्रदान चळवळीत सक्रिय आहेत. तसेच रत्नागिरीकरांसाठी मरणोत्तर नेत्रदानाची सोय लायन्स हॉस्पीटल येथे उपलब्ध करुन देतात. कोरोना कालावधीत जिल्हा रुग्णालयात ६० दिवस रोज संध्याकाळी १०० जणांसाठी पोळी-भाजी नेऊन देण्याचे कार्यसुद्ध केले आहे.
रत्नागिरीतले जे रुग्ण पुणे, कोल्हापूर येथे उपचार घेत असतील आणि त्यांना रक्ताची आवश्यकता भासल्यास या संस्थेच्या माध्यमातूनच त्यांना येथील रक्तदात्यांच्या कार्डवर नियमानुसार निःशुल्क रक्ताचा पुरवठा केला आहे. रत्नागिरी येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांनासुध्दा मार्गदर्शक तत्वांनुसार असे निःशुल्क रक्त उपलब्धतेनुसार दिले जाते.
---
रुग्णांची सेवाशुश्रुषा
संस्थेने आतापर्यंत रक्तदान शिबिरांचेसुद्धा यशस्वीपणे आयोजन केले. आता रत्नागिरी आणि परिसरातील घरी असणाऱ्या रुग्णांसाठी, वयस्कर, ज्येष्ठांसाठी शुश्रुषा सेवा देण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. परकार हॉस्पिटल येथे रत्नागिरी रक्त साठवणूक केंद्र ५ महिन्यांपूर्वीच संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये चालू केले आहे. या केंद्रामार्फत आजवर ४०० हून अधिक रक्तपिशव्या संकलित करुन ७२० इतक्या रक्तपिशव्या रक्तपेढीमार्फत रत्नागिरी येथील गरजू रुग्णांना पुरवल्या आहेत.