निराधार दांपत्यास ‘सामाजिक बांधिलकी’चा हात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निराधार दांपत्यास ‘सामाजिक बांधिलकी’चा हात
निराधार दांपत्यास ‘सामाजिक बांधिलकी’चा हात

निराधार दांपत्यास ‘सामाजिक बांधिलकी’चा हात

sakal_logo
By

81123
कारिवडे ः येथील निराधार वृद्ध दांपत्याला आर्थिक सहकार्यवेळी उपस्थित सामाजिक बांधिलकिचे पदाधिकारी.

निराधार दांपत्यास ‘सामाजिक बांधिलकी’चा हात

कारिवडेतील कुटुंब; आर्थिक मदतीसह जीवनावश्यक वस्तू सुपूर्त

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ७ ः कारीवडे-कुंभारवाडी येथील निराधार वृद्ध दांपत्याला सामाजिक बांधिलकीकडून आर्थिक सहकार्य करण्यात आले. यातील तारामती शेटकर (वय ७१) व हरिश्चंद्र शेटकर (वय ८१) यांची परिस्थिती खालावलेली आहे. त्यामुळे त्यांना हे सहकार्य करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल परूळेकर यांच्याकडून त्यांना ब्लॅंकेटही देण्यात आली. यावेळी सामाजिक बांधिलकीचे संजय पेडणेकर, समीरा खालील, रवी जाधव, प्रा. रुपेश पाटील, कीर्ती बोंद्रे, अशोक पेडणेकर, सतीश बागवे, हेलन निबरे, अॅम्बुलन्स चालक लक्ष्मण शिरोडकर, आमीन खलील, गगन ग्रास, अजय कोळंबेकर, बंड्या केरकर, बंटी माठेकर, वासुदेव खानोलकर, मंथेश पडते आदींनी या मदत कार्यात सहभाग घेतला.
शेटकर दांपत्याची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकीने त्यांची दखल घेऊन शक्य होईल तेवढे सहकार्य करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आपणही या निराधार वृद्ध दापत्यांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून केले आहे. भटवाडी, सामाजिक बांधिलकी संघटना व राजा छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर या सर्वांच्या माध्यमातून त्यांना रेशन व आर्थिक सहाय्य केले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते परुळेकर यांच्याकडून मायेची उब देणार ब्लॅंकेट देण्यात आले. सामाजिक बांधिलकीचे खालील यांनी निराधार वृद्ध दांपत्यांना पेन्शन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. दानशूर व्यक्तींनी या दांपत्यास मदत करण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या सदस्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.