उद्योजकांनी नावीन्य निर्माणाचा प्रयत्न करावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्योजकांनी नावीन्य निर्माणाचा प्रयत्न करावा
उद्योजकांनी नावीन्य निर्माणाचा प्रयत्न करावा

उद्योजकांनी नावीन्य निर्माणाचा प्रयत्न करावा

sakal_logo
By

rat०७२९.txt

(पान २ साठी)

फोटो ओळी
-rat७p२४.jpg ः
८११३४
मंडणगड ः कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रा. अरुण ढंग.
---
उद्योजकांनी नावीन्याचा प्रयत्न करावा

प्रा. अरुण ढंग ; मंडणगडात महिला उद्योजकता विकास प्रशिक्षण

मंडणगड, ता. ७ ः उद्योजक हा नावीन्य निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. त्याच्या मनातील नवनवीन कल्पना साकार करण्याच्या प्रयत्नात असतो तो तेवढ्यावर न थांबता पुन्हा पुढे नवीन शोधण्याचा प्रयत्न करत असतो. याचे अनुकरण उद्योजकांनी करावे, असे आवाहन प्रा. अरुण ढंग यांनी केले.
भारतीय उद्योजकता विकास संस्था, अहमदाबाद आयोजित टाटा कम्युनिकेशन मुंबई पुरस्कृत मंडणगड येथे अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील महिलांकरिता उद्योजकता विकास प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक अरुण ढंग उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला संस्थेचे संचालक रोशनी मर्चंडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शिबिराच्या माध्यमातून उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, सिद्धी प्रेरणा प्रशिक्षण, उद्योगसंधी निवड व शोध, उद्योगाशी निगडित सरकारी व निमसरकारी योजनांची माहिती, बँकेच्या कर्जयोजना, बाजारपेठ सर्वेक्षण आदी बाबींचा अंतर्भाव असल्याचे मर्चंडे यांनी नमूद केले. प्रास्ताविक संचालिका रोशनी मर्चंडे, सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन व्यवस्थापक राजेश मर्चंडे यांनी केले.