
मंडणगड-श्रमसंस्कार शिबिरातून अडखळ गावचा कायापालट
rat०७३०.txt
बातमी क्र..३० (पान २ साठी, अॅंकर)
फोटो ओळी
-rat७p२७.jpg ः
अडखळ ः निवासी शिबिरात बंधारा बांधताना ग्रामस्थ व एन. एस. एस. स्वयंसेवक.
------------
श्रमसंस्कार शिबिरातून अडखळ गावचा कायापालट
मुंडे महाविद्यालयाचे निवासी शिबिर ; ३२ मीटरचा वनराई बंधारा
मंडणगड, ता. ७ ः तालुक्यातील अडखळ गावाचा श्रमसंस्कार शिबिरातून कायापालट करण्यात आला. अंतर्गत रस्ते दुरुस्ती, स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच निवळी नदीवर ३२ मीटरचा लांब वनराई बंधारा बांधण्यात आला.
येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे दोन दिवसीय विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिर अडखळ येथे झाले. प्राचार्य प्रा. डॉ. राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व सरपंच करिना रक्ते यांच्या उपस्थितीत शिबिराचा सांगता समारंभ झाला. या वेळी ग्रामपंचायत सदस्य कल्पेश शिंदे, सुरेश रक्ते, सुनिती महाडिक, वाडी अध्यक्ष किशोर महाडिक, शंकर महाडिक, शंकर गायकवाड, अनंत शिंदे, ग्रामस्थ प्रसाद कदम, डॉ. प्रभाकर पेंडसे, विजय शिंदे, तेजस सोनगरे, आत्माराम महाडिक, सूरज महाडिक आदी उपस्थित होते.
व्यक्तिमत्व विकास व समाजप्रबोधन, ग्रामस्वच्छता, रस्ते दुरुस्ती, जलसाक्षरता, सार्वजनिक आरोग्य जाणीवजागृती, सांस्कृतिक कार्यक्रम आदी विविध उपक्रम राबवण्यात आले. शिबिराच्या पहिल्या दिवशी अडखळ गावातील अंतर्गत रस्ते दुरुस्त करण्यात आले. तसेच गावातील प्राथमिक शाळा, मंदिरे, बौद्धवाडी, आदीवासीवाडी, खालचीवाडी, वरचीवाडी व रामवाडी येथील रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत, पालापाचोळा व कचरा नष्ट करून ग्रामस्वच्छता करण्यात आली. दुसऱ्या दिवशी गावाशेजारील निवळी नदीवर सुमारे ३२ मीटर लांब व १ मीटर रुंदीचा वनराई बंधारा बांधण्यात आला. प्रश्नावलीच्या माध्यमातून ग्राम सर्वेक्षण करण्यात आले.
-----
कोट
केवळ दोनच दिवसांमध्ये स्वयंसेवकांनी आपल्या श्रमदानातून गावाचा कायापालट केलेला दिसत आहे. यासाठी सर्वच ग्रामस्थांनी खूपच मोलाची मदत केली आहे. त्यांच्या सान्निध्यात स्वयंसेवकही खूप काही शिकले आहेत. यापुढेही गावाशी असेच ऋणानुबंध कायम ठेवू
--प्रा. डॉ. राहुल जाधव, प्राचार्य