
असनिये परिसरात आगीत ६०० काजू कलमे खाक
81224
असनिये ः येथे लागलेल्या आगीत काजू कलमे जळून खाक झाली.
असनिये परिसरात आगीत
६०० काजू कलमे खाक
ओटवणे, ता. ७ ः असनिये काळीमाती भागात काजूच्या बागेला अचानक आग लागून काजूची ६०० कलमे भस्मसात झाली. यात शेतकऱ्यांचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले.
असनिये येथील प्रगतशील बागायतदार दिनकर चंद्रकांत सावंत यांची काळीमाती डोंगरात काजू कलमे असलेली बाग आहे. काल (ता. ६) दुपारी ही आग लागल्याने डोंगरात वणवा लागला होता. घरापासून बागायत दूर असल्याने याची माहिती सावंत कुटुंबीयांना उशिरा मिळाली. तोपर्यंत जवळपास ६०० कलमे आगीत जळून खाक झाली. आग लागल्याची माहिती समजताच सावंत कुटुंबीयांसह शेजाऱ्यांनी तातडीने धाव घेतली; मात्र आग आटोक्यात आणणे शक्य नसल्याने आगीत कलमे खाक झाली. सध्या काजू बियांनी ही बाग बहरली होती. दिवसरात्र काबाडकष्ट करून सावंत कुटुंबीयांनी ही बाग साकारली होती. आताच काजू हंगाम सुरू झाला असतानाच हातातोंडाशी आलेल्या उत्पादनासह बागायती भस्म झाल्याने सावंत कुटुंबीयांना धक्का बसला आहे. आगीचे कारण समजू शकले नाही. कृषी सहाय्यक अतुल माळी यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.