भवानीची (पार्वतीची) मंदिरे अधिक

भवानीची (पार्वतीची) मंदिरे अधिक
Published on

rat०८१३.txt

बातमी क्र..१३ ( टुडे पान ४ साठी)
(२ फेब्रुवारी टुडे पान चार)

जनरिती- भाती लोगो

फोटो ओळी
-rat८p७.jpg ः
८१२५४
डॉ. विकास पाटील
- rat८p२.jpg-
८१२४९
राजापूर तालुक्यातील धूतपापेश्वर मंदिर.
---

कोकणात शिव आणि शक्तीची उपासना प्राचीन काळापासून आजपर्यंत मोठ्या प्रमाणात केली जाते. मंदिराबाहेर असणाऱ्या नळावर हात पाय धुवून, चूळ भरून मंदिरात आजही प्रवेश करावा लागतो. यातूनच मंदिराचे पावित्र्य जपण्याची रीत जनमानसात रूजली असावी. स्वच्छतेला महत्व येथे प्राचीन काळापासून असल्याचे दिसते. होळीला देवीची पालखी गावच्या प्रत्येक वाडीतून फिरून मांडावर येते. तिथे स्त्रियांच्याकडून देवीची ओटी भरली जाते. या वेळी गाऱ्हाणे घालून देवीची ओटी भरणाऱ्यांचे सुख समाधान चिंतले जाते. दसरा सणाला प्रत्येक गावात देवीच्या मंदिरात होमकूंड पेटवले जाते. होळी, दसरा या सणात देवीच्या मानकऱ्यांना सन्मानाचे स्थान असते. मंदिरातही या कालखंडात वेगवेगळ्या परंपरा जपल्या जातात. सातासमुद्रापार असणारा कोकणी माणूस आपल्या प्रथा परंपरा जपण्यासाठी उत्सवाच्यावेळी उत्साहाने आवर्जून उपस्थित राहतो. आपल्या मागच्या पिढीकडून चालत आलेली प्रथा परंपरा आनंदाने पूर्ण करतो.

--
शक्तीची उपासना म्हणून भवानीची (पार्वतीची) मंदिरे अधिक

कोकणात शिवमंदिरे जशी संख्येने अधिक आहेत तशीच शक्तीची उपासना म्हणून भवानीची (पार्वतीची) मंदिरे अधिक आहेत. कोकणात शैव संप्रदाय मोठ्या प्रमाणात असावा. आजही येथे जंगलमय प्रदेश अधिक आहे. पूर्वीच्या कालखंडात येथील वसाहतकारांनी आपल्या सोयीनुसार ग्रामदैवतांची स्थापना केली असावी. नंतरच्या कालखंडात उत्तर भारतात अनेक राजकीय घडामोडी झाल्या. अनेक परकीय आक्रमणे झाली. तेथील व्यवस्थेला कंटाळून काही रजपूत सरदार, राज्यकर्ते कोकणात उतरलेत. कोकणात असणाऱ्या शासनकर्त्यांकडून त्यांनी वतने, जहांगिऱ्या मिळवल्या. काही ठिकाणी ते स्वतः शासनकर्ते बनले. उत्तरेकडून त्यांनी आणलेल्या शिवोपासनेबरोबरच येथे पार्वतीमातेची उपासना सुरू केली असावी. त्याचवेळी पूर्वापार चालत आलेल्या येथील ग्रामदैवतांना त्यांनी सन्मानपूर्वक स्थान दिले असावे. म्हणूनच प्रत्येक गावात मुख्य देवतेबरोबरच इतर देवींची स्थापना झालेली आहे. येथील ग्रामव्यवस्थेला एक नवीन चौकट तयार झाल्याचे दिसते. शिवाबरोबरच भवानीची पावणाई, शिवराई, आर्या दुर्गा, अंबा, दुर्गादेवी, दिर्बा देवी अशी वेगवेगळी नावे असली तरी ही भवानीचीच उपासना होय. ही देवी कशी प्रकट झाली या विषयी अनेक आख्यायिका ऐकायला मिळतात. त्यामध्ये प्रामुख्याने देवीने प्रसन्न होऊन भक्ताला मी तुझ्यासोबत येते तू पुढे चल; पण चालताना पाठीमागे पाहू नको, असे सांगितले. भक्त गावाजवळ पोहोचल्यावर मात्र त्याला पाठीमागे पाहण्याचा मोह आवरला नाही त्यामुळे देवी तेथेच अंतर्धान पावली. ती त्याच ठिकाणी राहिली आहे. तिथेच देवीचे मंदिर बांधले. ही आख्यायिका अधिक प्रमाणात आढळते. राजापूर तालुक्यातील देवीहसोळ गावच्या आर्यादुर्गेला ही आख्यायिका लागू पडते. शेतकरी शेती नांगरत असताना नांगराचा फाळ एका ठिकाणी अडकला. शेतकऱ्यांनी त्या ठिकाणाहून नांगर काढल्यावर रक्त यायला लागले. शेतकऱ्याने गावकऱ्यांना सांगून त्या ठिकाणी खोदकाम केले. त्या ठिकाणी देवीची मूर्ती सापडली. तिचाच उत्सव मंदिर बांधून सुरू झाला. मोठ्या प्रमाणात आढळणारी ही आणखी एक आख्यायिका. समुद्रकिनाऱ्यावर असणाऱ्या कोळ्यांना त्यांच्या जाळ्यात मूर्ती सापडणे, त्यानंतर कोळ्यांना दृष्टांत होणे, त्याने तो गावकऱ्यांना सांगणे, त्यानंतर मूर्तीची प्रतिष्ठापना करून गावकऱ्यांनी त्यावर मंदिर बांधणे ही आख्यायिका समुद्रकिनारी असणाऱ्या देवीच्या मंदिरांसंदर्भात ऐकायला मिळते. दिर्बादेवी, आडीवरेची महाकाली या देवींच्या संदर्भात अशा आख्यायिका ऐकायला मिळतात. याबरोबरच मूर्ती एखाद्या झाडीत असणे, एखाद्या झाडाखाली असणे आणि मग भक्ताला दृष्टांत होणे. भक्ताने तो गावकऱ्यांना सांगून गावकऱ्यांच्या साहाय्याने त्या ठिकाणी मूर्ती शोधून काढणे व तिची प्रतिष्ठापना करणे यासारख्या आख्यायिका आढळतात. गोविंदगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गोवळकोट येथील करंजेश्वरी देवीच्या संदर्भात ही आख्यायिका सांगितले जाते. काही ठिकाणी शंकरावर रूष्ट होऊन रागाने बाहेर पडलेल्या पार्वतीमातेची विनंती करण्यासाठी स्वतः शंकर भगवान आले. पार्वतीचा राग गेल्यावर दोघेही गुप्त रूपाने तेथेच राहिल्याचे सांगितले जाते. रेडी येथील महादेव व माऊली, रेवंडी येथील भद्राकाली यांना ही आख्यायिका लागू पडते.
वाघेरीच्या लिंगेश्वर पावणाई मंदिरात देवाच्या जागरासाठी चक्क पट लावला जातो व रात्रभर जागर केला जातो. संगमेश्वर तालुक्यातील वांद्री- उक्षी गावाच्या सीमेवर नदीपात्रात होणारी ग्रामदेवतांच्या पालखीची भेट हा भाविकांसाठी अनुपम्य सोहळाच असतो. त्रिपुरारी पौर्णिमा, दसरोत्सव आणि शिमगोत्सव हे तिन्ही उत्सव येते मोठ्या प्रमाणात साजरे होताना दिसतात.

(लेखक महाविद्यालयाचे मराठीचे प्राध्यापक आहेत.)
--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.