‘विंचू चावला’ पथनाट्याला द्वितीय क्रमांक

‘विंचू चावला’ पथनाट्याला द्वितीय क्रमांक

81285
कुडाळ ः उडान महोत्सवात यश मिळविलेले राऊळ महाराज महाविद्यालयाचे विद्यार्थी.


‘विंचू चावला’ पथनाट्याला द्वितीय क्रमांक

राऊळ महाविद्यालयाचे यश; उडान महोत्सवात गुणवत्तेचे दर्शन

कुडाळ, ता. ८ ः मुंबई विद्यापीठाच्या उडान महोत्सवात येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाने सादर केलेल्या स्त्री-भ्रूणहत्येवरील ‘विंचू चावला’ या पथनाट्याने द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच भित्तिचित्र रेखाटन आणि सृजनशील लेखन या स्पर्धेतही अनुक्रमे तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केले.
मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागातर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीचा जिल्हास्तरीय सांस्कृतिक ‘उडान महोत्सव २०२३’ नुकताच दोडमार्ग येथे लक्ष्मीबाई हळबे महाविद्यालयामध्ये झाला. यामध्ये १४ महाविद्यालयांनी पथनाट्य, भित्तिचित्र रेखाटन, सृजनशील लेखन आणि वक्तृत्व आदी स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला. संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाने सादर केलेल्या स्त्री-भ्रूणहत्येवरील ‘विंचू चावला’ पथनाट्याने द्वितीय क्रमांक पटकावला. यामध्ये मानसी राऊळ, वैष्णवी धामापूरकर, अस्मिता लाड, सानिका कुंटे, शुभम तारी, जयराज कुडाळकर, ऋषिकेश केळुसकर, यज्ञेश नलवडे, संचित नेरुरकर, अथर्व नेरूरकर, रामचंद्र परब या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच भित्तिचित्र रेखाटन (पोस्टर मेकिंग) या स्पर्धेत सुयश भोवड या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. सृजनशील लेखन या स्पर्धेत प्राची देसाई हिने उत्तेजनार्थ यश मिळविले. सर्व सहभागी आणि विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे पदाधिकारी भाई तळेकर, आनंद वैद्य, सुरेश चव्हाण, का. आ. सामंत, प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही. बी. झोडगे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले. विभागाचे विस्तारकार्य शिक्षक डॉ. डी. जी. चव्हाण, डॉ. एन. आर. काळे, प्रा. योगिता वायरकर यांनी मार्गदर्शन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com